कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे धसत चाललेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सगळीकडून प्रयत्न होत असताना शेतकरी आंदोलकांनी भारत बंद पुकारला आहे. त्यामुळे त्याला सर्वसामान्य जनतेकडून कितपत प्रतिसाद मिळेल याविषयीच मूळात शंका आहे.Unilateral support of opposition parties for tomorrow’s India Bandh of farmers’ agitators; The benefit of the bandh to the opposition or the farmers’ protesters ??
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने उद्या (२७ सप्टेंबर) भारत बंद पुकारला आहे. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे धसत चाललेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सगळीकडून प्रयत्न होत असताना शेतकरी आंदोलकांनी भारत बंद पुकारला आहे. त्यामुळे त्याला सर्वसामान्य जनतेकडून कितपत प्रतिसाद मिळेल याविषयीच मूळात शंका आहे.
त्यातही या आंदोलनाचे पुरते राजकीयीकरण विरोधी पक्षांनी केले असून उद्याचा बंद यशस्वी झाला तरी त्याचा फायदा शेतकरी आंदोलकांना होणार की विरोधी पक्षांना होणार?,हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
काँग्रेससह समाजवादी पक्ष, राजद, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलगू देशम, वायएसआर काँग्रेस, डीएमके, बहुजन समाज पक्ष, अकाली दल टीआरएस आदी पक्षांनी आपापल्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांचा बंद यशस्वी करून दाखवण्याचा चंग बांधला आहे.
कारण ती त्यांची भाजपा विरोधातली राजकीय गरज आहे. अशा स्थितीत भाजप आणि एनडीएमध्ये उरलेले घटक पक्ष या बंद संदर्भात नेमके कसे धोरण आखतात आणि त्यावर कशी मात करतात?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
शिवाय आज विरोधकांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये त्या पक्षांनी कृषी कायद्यांविरोधात विधानसभांमध्ये ठराव मंजूर करून घेतले हे खरे. परंतु, घटनात्मक दृष्ट्या त्यांना केंद्रातल्या कृषी कायद्यांच्या विरोधात राज्यांचे कृषी कायदे करता येत नाहीत. त्यामुळे त्यांना गप्प बसावे लागले आहे. अर्थात हेच विरोधी पक्ष केंद्रात एकत्र येऊन सत्तेवर आले तर आत्ता लागू केलेले कृषी कायदे पूर्णपणे बदलण्याचे आश्वासन ते शेतकऱ्यांना देण्याचे टाळत आहेत.
कारण त्यातल्या व्यावहारिक अडचणी त्यांना माहिती आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदचा राजकीय फायदा उपटण्याच्या पलीकडे विरोधी पक्षांचा स्वार्थ यापेक्षा यात दुसरे काही दिसत नाही.
Unilateral support of opposition parties for tomorrow’s India Bandh of farmers’ agitators; The benefit of the bandh to the opposition or the farmers’ protesters ??
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप नेत्यांच्या तृणमूलमध्ये प्रवेशासाठी कार्यालयाबाहेर रांगा, बॅनर्जी यांचा टोला
- देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानांचा अमेरिकेला विनाथांबा थेट प्रवास
- CYCLONE GULAB : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! चक्रीवादळ गुलाबमुळे भारतीय रेल्वेने 27 सप्टेंबरपर्यंत अनेक गाड्या केल्या रद्द ; पाहा संपूर्ण यादी…
- CYCLONE GULAB : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला ‘गुलाब’ नाव का? कोण करतं चक्रीवादळांच नामकरण?