• Download App
    तांबेंच्या बंडखोरीच्या निमित्ताने काँग्रेस मधली अस्वस्थता बाहेर; नानांना हटविण्याची काँग्रेस नेत्याचीच मागणी Uneasiness in the Congress on the occasion of the Tambe Rebellion out

    तांबेंच्या बंडखोरीच्या निमित्ताने काँग्रेस मधली अस्वस्थता बाहेर; नानांना हटविण्याची काँग्रेस नेत्याचीच मागणी

    प्रतिनिधी

    मुंबई : सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करून नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून काँग्रेस पक्षात नाराजीचे वातावरण पसरले आहे. काँग्रेस मधली अस्वस्थता बाहेर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यशैलीवर बोट ठेवले जात आहे. नाशिक मध्ये घडलेल्या बंडखोरीला नाना पटोले जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. याबाबत आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना निवेदन लिहिले आहे. Uneasiness in the Congress on the occasion of the Tambe Rebellion out

    आशिष देशमुख यांनी हे निवेदन ट्विटवर शेअर केले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष तात्काल बदलण्याची नितांत गरज आहे. या संबंधित निवेदन मी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांना केले आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

    बालेकिल्ला काँग्रेसच्या हातातून निसटला

    महाराष्ट्रातील काँग्रेसची परिस्थिती चिंताजनक, प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज असा आशिष देशमुखांनी लिहिलेल्या निवेदनाचा विषय आहे. या निवेदनातून नाना पटोलेंच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे. देशमुखांनी या निवदेनात म्हटले आहे की, शेतकरी, कामगार, आदिवासी, युवा वर्ग, महिला, शोषित, पिडीत, वंचित, मागासवर्गीय यांचे प्रश्न व्यवस्थित हाताळण्यासाठी तसेच संघटनात्मक कार्य करून ओबीसी, महिलांवरील अत्याचार आणि जनहितार्थ मुद्द्यांवर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये नाना पटोले यांना मोठ्या विश्वासाने काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली. पण तो विश्वास त्यांनी सपशेल फोल ठरवला. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशैलीमुळे हा बालेकिल्ला आता काँग्रेसच्या हातातून निसटला आहे, हे सर्वश्रुत आहे, असे मांडत आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

    Uneasiness in the Congress on the occasion of the Tambe Rebellion out

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !