• Download App
    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची कोरोनावर मात, एम्समधून पुन्हा तिहार तुरुंगात पाठवले । Underworld don Chhota Rajan Back To Tihar Jail From AIIMS, After Recovered From Corona

    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची कोरोनावर मात, एम्समधून पुन्हा तिहार तुरुंगात रवानगी

    Underworld don Chhota Rajan  : कोरोनातून पूर्णपणे बरा झाल्याने कुख्यात गॅंगस्टर छोटा राजनची तिहार तुरुंगात परत रवानगी करण्यात आली आहे. एम्स अधिकाऱ्यांनी सांगितले की, छोटा राजनला मंगळवारी एम्स रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यानंतर आता त्याला पुन्हा तिहारमध्ये पाठवले आहे. छोटा राजनला 22 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर 24 एप्रिलला अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले होते. Underworld don Chhota Rajan Back To Tihar Jail From AIIMS, After Recovered From Corona


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनातून पूर्णपणे बरा झाल्याने कुख्यात गॅंगस्टर छोटा राजनची तिहार तुरुंगात परत रवानगी करण्यात आली आहे. एम्स अधिकाऱ्यांनी सांगितले की, छोटा राजनला मंगळवारी एम्स रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यानंतर आता त्याला पुन्हा तिहारमध्ये पाठवले आहे. छोटा राजनला 22 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर 24 एप्रिलला अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले होते.

    तत्पूर्वी, अशी अफवा पसरली होती की, छोटा राजनचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी छोटा राजन जिवंत असल्याचे माध्यमांना स्पष्ट केले होते. 61 वर्षीय छोटा राजनला 2015 मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथील प्रत्यार्पणानंतर दिल्लीच्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईतील सर्व प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्यात आली असून त्याच्यावर खटला चालविण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे.

    गेल्या महिन्यात 22 एप्रिल रोजी सीबीआयच्या विशेष कोर्टाने 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी हनीफ कडवाला हत्येप्रकरणी छोटा राजन आणि त्याच्या साथीदाराची निर्दोष सुटका केली होती. 1993च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार टायगर मेमनच्या सूचनेवरून कडावालाने मुंबईत शस्त्रे आणली होती. या स्फोटांमध्ये 250 हून अधिक लोक ठार झाले होते. 7 फेब्रुवारी 2001 रोजी कडावलाची तीन जणांनी हत्या केली होती. खून खटल्याची चौकशी करणार्‍या सीबीआयने आरोप केला होता की, लोकप्रियतेसाठी राजनने कडावालाची हत्या घडवून आणली. याआधीही राजनने स्फोट प्रकरणातील अनेक आरोपींची हत्या केली आहे. पुराव्यांच्या अभावामुळे कोर्टाने राजन आणि जयस्वाल यांची निर्दोष मुक्तता केली होती.

    Underworld don Chhota Rajan Back To Tihar Jail From AIIMS, After Recovered From Corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य