• Download App
    Kisan Samman Nidhi Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 9.32 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ₹ 18,640 कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे वाटप

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 9.32 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ₹ 18,640 कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे वाटप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 9.32 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ₹ 18,640 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या 22 व्या हप्त्याचे हस्तांतर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली.

    – धनगर समाजाच्या मागण्या मान्य

    या कार्यक्रमाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी तीन महत्त्वाच्या बैठका घेतल्या. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात शिष्टमंडळासमवेत बैठक. यावेळी मंत्री गिरीश महाजन, खासदार रामराव वडकुते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

    – कुंभमेळ्याच्या संदर्भात सूचना

    त्याच बरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027’ संदर्भातील शिखर समितीची आढावा बैठक झाली. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

    बोरिवली पुनर्वसना संदर्भात बैठक

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथील अतिक्रमण निष्कासन आणि अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने आढावा बैठक.
    यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    Under the Prime Minister Kisan Samman Nidhi Yojana, Narendra Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Asim Sarode : धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेणारा कायदा; धर्मस्वातंत्र्य विधेयकावर असीम सरोदेंची टीका, म्हणाले- समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल

    Prakash Ambedkar : PM नरेंद्र मोदी पूर्णपणे कॉम्प्रोमाइज झालेत; देशाच्या विरोधात निर्णय घेत आहेत, प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल

    Petrol-Diesel : सरकारने म्हटले- पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही, LPG चिंतेचा विषय; दररोज 75.7 लाख सिलिंडर बुक होत आहेत