विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील जनता आस्मानी संकटामुळे उद्धवस्त झाली आहे. महाविकास आघाडीचे कर्ते शरद पवार निष्क्रिय असून मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळण्यासाठी दौरे केले म्हणून पुतण्याची तेकान उघडणी करत आहेत,अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.Uncle pulls nephew’s ear; Government chair rescue program : Gopichand Padalkar
ते म्हणाले, पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’ कार्यात व्यग्र आहे. ज्याप्रमाणे कर्जबुडव्या साखर कारखान्यांना ३८०० कोटी देण्यासाठी सरकारी तिजोरी उघडली जाते. मग त्याचप्रमाणे फडणवीस सरकारने केलेल्या मदती प्रमाणे हे सरकार तातडीची मदत का करत नाही ?
फडणवीस सरकारने तातडीने व कोणतेही निकष न लावता घरपडीला ९५०००,भाड्याने राहण्यासाठी २५०००, व्यापाऱ्यांना ५०००० तर शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० मदत केली होती..
आता तर परिस्थिती महाबिकट आहे.एकीकडे ‘लॉकडाऊन -लॉकडाऊन’ च्या खेळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडल आणि व्यापारी रडकुंडीला आला आहे. असा दुहेरी संकटाचा सामना सामान्य जनता आणि व्यापारी करत आहेत.
व्यापाऱ्यांना व सामान्य जनतेला कुठल्याही निकषाच्या चक्रव्यूव्हात न अडकवता आधी तातडीने प्रत्येकी १ लाख रूपयाची मदत करावी.व्यापाऱ्यांना वर्षभरासाठी भाडेपट्टी व वीजबील माफीची मदत जाहीर करून लवकरात लवकर अमलात आणावी.
- महाविकास आघाडीचे कर्ते शरद पवार निष्क्रिय
- दौरे केले म्हणून पुतण्याची ते कान उघडणी
- महाराष्ट्रातील जनता आस्मानी संकटामुळे त्रस्त
- लॉकडाऊन’ च्या खेळामुळे अर्थव्यवस्था मोडली
- सामान्य जनता आणि व्यापारी सुल्तानी संकटात
- प्रत्येकी १ लाख रूपयाची मदत करावी
- वर्षभरासाठी भाडेपट्टी व वीजबील माफ करावे