विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे न ठरवता “एकमत” पाच राज्यांच्या निवडणुका सोडा आधी भांडू या कोर्टातच!!, असे चित्र निर्माण झाले आहे.Uncle-nephew unanimity for fear of freezing the clock symbol
शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचे पक्ष स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष म्हणवून घेतात. दोन्ही नेते आपला उल्लेख पक्षाचे “राष्ट्रीय अध्यक्ष” असा करतात, पण मूळातच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने आधीच काढून घेतला आहे आणि त्यानंतर पक्षामध्ये फूट पडली आहे. त्यामुळे दोन्ही गटांचा राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह घड्याळ यावर दावा आहे. राष्ट्रवादीतले हे भांडण निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात असतानाच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. त्या निवडणुकांमध्ये दोन्ही गट उतरले तर कदाचित निवडणूक आयोग घड्याळ चिन्ह कायमचे गोठवून टाकून दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह प्रदान करेल ही भीती शरद पवार आणि अजित पवारांना वाटत आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी कुठलीही आपापसात बैठक न घेता किंवा एकमेकांमध्ये चर्चा करून न ठरवता “एकमत” केले आहे, ते म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुका दोन्ही गट लढविणार नाहीत.
निवडणूक आयोग घड्याळ चिन्ह गोठवून दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह देऊन टाकेल भीतीतून शरद पवारांनी आणि अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभे करणार नाही. त्यामुळे उमेदवारांपेक्षा संख्येने जास्त असलेल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करणे देखील उद्भवत नाही.
शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात एका विधानसभेची पोटनिवडणूक लागली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना तात्पुरती मशाल आणि ढाल तलवार ही चिन्हे देऊन तो प्रश्न सोडविला होता. यापैकी उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह कायम ठेवले गेले आणि एकनाथ शिंदे गटाला त्यांचे तात्पुरते दिलेले ढाल तलवार हे चिन्ह काढून घेऊन शिवसेनेचे मूळ चिन्ह धनुष्यबाण प्रदान केले गेले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवल्या असत्या तर निवडणूक आयोगाने नेमके हेच केले असते. घड्याळ चिन्ह गोठविले असते आणि दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह देऊन निवडणूक लढायला सांगितले असते. त्याचबरोबर कदाचित घड्याळ चिन्ह कायमचे गोठवून निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देताना वेगवेगळे चिन्हे देऊन विषय मोकळा केला असता.
पाच राज्यांच्या निवडणुकांपुरता तो प्रश्न सुटला असता, पण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने मात्र राष्ट्रवादीचे दोन्ही गट घड्याळ चिन्ह कायमचे गमावून बसले असते. हे टाळण्यासाठी दोन्ही गटांनी कोणतीही बैठक न घेता एकमेकांमध्ये कोणतीही बैठक न घेता अथवा चर्चा न करता परस्पर “एकमत” करून टाकून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे.
Uncle-nephew unanimity for fear of freezing the clock symbol
महत्वाच्या बातम्या
- Same Sex Marriage: ‘लग्न फक्त पुरुष आणि स्त्रीमध्येच होते’, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले ओवैसी!
- एअर एशियाच्या सीईओने मसाज घेताना केली मीटिंग; फोटो शेअर करून म्हटले हे कंपनीचे कल्चर; ट्रोल होताच पोस्ट डिलीट
- बायडेन इस्रायलमध्ये पोहोचले; गाझातील हॉस्पिटल वरच्या हल्ल्याबद्दल मोदींचे ट्विट दोषींना शिक्षा करा!!
- मनी लाँड्रिंगसंदर्भात दाखल केलेल्या पुनरावलोकन याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी; कायद्याच्या दोन नियमांना करणार रिव्ह्यू