वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनामुळे राज्याच लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अत्यावश्यक सेवेत छत्री, रेनकोट आणि ताडपत्री व्यावसायिकांचा समावेश केला आहे. पावसाळ्या पूर्वी छत्री, रेनकोट आणि ताडपत्री विकणाऱ्या व्यापाऱ्यांचा सीजन फक्त दोन ते तीनच महिनेच असतो. त्यामुळे या व्यापाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत समावेश केल्याने दिलासा मिळाला आहे. Umbrella, raincoat and tarpaulin professionals involved in essential services
भिवंडी आणि परिसरात कारखाने सुरु आहेत. माल विकायचा कुठे असा प्रश्न या व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाला होता. आज व्यापाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रांकडून हा निर्णय घेतल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग, कामगार वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे.
माथाडी कामगारांचेही पोट मुंबईतील छत्री बाजारावर भरत असते. या बाजारात जवळपास 400 दुकाने आहेत. ह्यातील काही दुकानांमध्ये छत्री, रेनकोटचा ठोक माल विकला जातो. हा व्यवसाय तीन ते चार महिनेच होत असतो. त्यामुळे लॉकडाऊनची झळ बसली असती तर त्यांचं मोठं नुकसान झालं असतं. त्यामुळे व्यावसायाचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश झाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.
कोरोना रोखण्यासाठी छत्रीचा वापर
व्यापाऱ्यांकडून मास्कसोबतच छत्र्यादेखील ठेवणं बंधनकारक करावं अशी मागणी केली आहे. ज्यात पावसाळ्यात कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचायचं असेल तर छत्र्यांच्या वापर करायला हवा. सोशल डिस्टन्सिंग तसंच मेनटेन होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी छत्र्या आम्ही ना नफा, ना तोटा तत्वावर देण्यास तयार असल्याचं व्यापाऱ्याने सांगितलं.