विशेष प्रतिनिधी
मुंबई : उध्दवा अजब तुझो सरकार असे म्हणत आर्यन खाननंतर वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहा, असा सल्ला शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी आघाडी सरकारला दिले आहे. दिवाळीनंतर शिवसंग्राम रस्त्यावर उतरणार असून हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही मेटे यांनी दिला.Uddhva Ajab Tujhe Sarkar, if you have time after Aryan Khan, look at the farmers, Vinayak Mete’s advice
गेल्या 26 दिवसांपासून राज्यात आर्यन खान आणि मुंबई ड्रग्स प्रकरण गाजत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते या प्रकरणावरुन एनसीबी आणि भाजपवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर मेटे म्हणाले, बीड जिल्ह्यात केवळ दहा महिन्यातच 159 आत्महत्या झाल्या आहेत.
जिल्हा प्रशासनासाठी आणि सरकारसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. प्रशासनाने किती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन चौकशी केली?शिवसंग्राम पक्ष पुणे महापालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे.
यासाठी रविवारी पुण्यात शिवसंग्रामचा पदाधिकारी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विनायक मेटे आपली भूमिका आणि निर्णय जाहीर करणार आहेत. निवडणूक स्वतंत्र्यरित्या लढवावी की भाजपशी आघाडी करावी, यावरही चर्चा होणार आहे.
Uddhva Ajab Tujhe Sarkar, if you have time after Aryan Khan, look at the farmers, Vinayak Mete’s advice
महत्त्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मित निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सात बेड्या तोडून हिंदुत्वाला सबळ केले; रणजित सावरकर यांचे प्रतिपादन
- शिवसेनेचे चार मोहरे राष्ट्रवादीत , कोकणात झाला करेक्ट कार्यक्रम
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात , ‘ या ‘ दिवशी मिळणार बोनससह DA च्या थकबाकीचे पैसे