विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘‘ठाकरे – पवार सरकारमधील घोटाळेबाज मंत्री मोकाट असून भ्रष्टाचार करून उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांचे घोटाळे आणखी उघड करण्यासाठी मी कोल्हापूरला जात असताना मला घरातच स्थानबद्ध केले जात आहे. ही सरकारची गुंडशाही आणि दाडपशाही आहे,” असा संताप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.Uddhava your strange government; scam minister are free and myself is being House Arrest : Kirit Somaiya’s anger
मी प्रथम गणेश विसर्जन करून नंतर कोल्हापूरला जाण्यासाठी घराबाहेर पडत असताना पोलिसांनी मला रोखले. हा प्रकार दडपशाहीचा आहे. मला घरात अडवून ठेवणे अयोग्य आहे, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारचा तीव्र निषेध केला आहे.
ठाकरे सरकारची ही गुंडगिरी आहे. पोलिस दडपशाही आहे. माझा घराखाली पोलिसांची गर्दी केली आहे. माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी आणि हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी मला मुलुंडच्या माझ्या घरातून अटक करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत, असा आरोपच सोमय्यांनी केला.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे घोटाळे बाहेर काढले. मी कोल्हापूरमध्ये जाऊन कागल परिसरात आणखी पाहणी करणार होतो. पण, माझ्या घरी पोलिसांचा फौजफाटा पाठला आहे. घोटाळे हे ठाकरे- पवार सरकार करत आहे, त्यांचे मंत्री करत आहेत, अटक मात्र त्यांना केली जात नाही, उलट मलाच अटक केली जात आहे,
असे काम ठाकरे – पवार सरकार करू शकते, अशी जोरदार टीकाही सोमय्यांनी केली. मला गणपती विसर्जनाला जाऊ दिले जात नाही, कागलमधील मुश्रीफ यांच्या गैरव्यवहाराचा भांडाफोड केल्यानंतर परत येणार आहे, असेही सोमय्यांनी सांगितलं.
Uddhava your strange government; scam minister are free and myself is being House Arrest : Kirit Somaiya’s anger
महत्त्वाच्या बातम्या
- डोंबिवलीत पाण्यापाई तरुणीचा हात मोडला कल्याण-डोंबिवलीत २७ गावे तहानलेली
- दोन प्रौढ व्यक्तींना धर्माचा विचार न करता जोडीदार निवडण्याचा अधिकार, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा
- फौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही
- मोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप