विशेष प्रतिनिधी
मुंबई : मातोश्रीतल्या बंद खोलीत झालेल्या चर्चा बऱ्याच दिवसानंतर विधिमंडळातल्या लिफ्ट मध्ये आल्या. त्यावर माध्यमांनी बऱ्याच अटकळी बांधल्या, पण या सगळ्या राजकीय अटकळी नंतर उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावल्या. Uddhav Thackrey Expressed His Views About Meeting With Devendra Fadnvis In Maharashtra Assembly Lift
त्याचे झाले असे :
मातोश्री मध्ये अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बंद खोलीत चर्चा झाली होती. त्याचे पडसाद गेली 5 वर्षे महाराष्ट्रात सतत उमटत राहिले. त्या बंद खोलीतल्या चर्चेनंतर महाराष्ट्रात बऱ्याच उलथापालथी घडल्या. अडीच वर्षांनंतर ठाकरे – पवार सरकार गेले. शिंदे – फडणवीस सरकार आले. नंतर त्यात अजित पवार जोडले गेले.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर
विधिमंडळाच्या शेवटच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी लिफ्टमध्ये प्रवेश केला. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये काही अनौपचारिक गप्पांची देवाण-घेवाण झाली पण बऱ्याच दिवसानंतर ठाकरे आणि फडणवीस समोरासमोर आले आणि एकाच लिफ्टने वर गेले याची चर्चा माध्यमांनी वेगवेगळ्या अटकळींनी पसरवली ठाकरे फडणवीस जवळ आले त्यामुळे महायुतीत आणखी बेरीज झाली वगैरे बातम्या माध्यमांमध्ये पसरल्या महाराष्ट्रातले नवीन समीकरण लिफ्ट मधून बाहेर येणार का??, इथपर्यंत चर्चा रंगत गेल्या पण नंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी त्या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या. या भेटीतून कुठलेही अर्थ काढू नका, ती फक्त योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. असं म्हणतात की भिंतीला कान असतात, पण लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. त्यामुळे यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू अशी मिश्कील टिपण्णी ठाकरे यांनी केली. फडणवीस व आपल्यात कोणतीही राजकीय चर्चा झाल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले.
निकालाआधीच उद्धव ठाकरेंना झटका; 20 मेच्या पत्रकार परिषदेप्रकरणी निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
पुणे ड्रग्स प्रकरणावर आवाज उठवणार
पुण्यातील ड्रग्स प्रकरणावर आम्ही आवाज उठवणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही त्यावर आवाज उठवणार आहे. पण सरकार सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे. सरकारला खेचायचं आहे. हे ड्रग्स येतात कुठून? राज्यातील केमिकल्सचे कारखाने हे सोर्स आहे का, उद्योगमंत्री काय करतात. उद्योगमंत्र्यांचे हे सोर्स आहे का??, या गोडाऊनचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे. ड्रग्स प्रकरणावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कुणाचेही सगे सोयरे असू द्या. विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे. आम्ही प्रश्न विचारतोय म्हणून तुमच्या काळात जास्त ड्रग्स सापडले असे फालतू उत्तर नको. त्याच्या मूळाशी जा आणि खणून काढा. जे पोलीस अधिकारी कर्तव्यात कसूर करतात त्यांना निलंबित केलं पाहिजे. त्यांना सेवेतून मुक्त केलं पाहिजे, अशी मागणी उद्धव यांनी केली.
विधानसभा अधिवेशनात उद्या अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. मात्र हा गाजर संकल्प आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्या गाजरं दाखवलं जाणार आहे. आजपर्यंत ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी किती झाली. त्याची श्वेतपत्रिका काढा. ही श्वेतपत्रिका कोरा कागद असणार आहे. याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ?
महायुतीत अपयशाच्या धन्याचा चेहरा पुढे येऊ द्या. एकमेकांवर आरोप करत आहेत. आम्ही विकास आघाडीचा चेहरा योग्यवेळी बाहेर आणू. महाविकास आघाडीचा चेहरा महाराष्ट्र आहे. मी वर्धापन दिनाच्या भाषणात म्हणालो, वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी. त्यांच्या अपयशाचा चेहरा नक्की कोण हे समोर येऊ येऊ दे मग आम्ही आमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackrey Expressed His Views About Meeting With Devendra Fadnvis In Maharashtra Assembly Lift
महत्वाच्या बातम्या
- केजरीवालांना 3 दिवसांची सीबीआय कोठडी; दररोज 30-30 मिनिटे पत्नी आणि वकिलाला भेटता येईल; औषधे आणि घरचे अन्न खाण्याची परवानगी
- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती खालावली!
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज भाषण, दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार
- मुख्यमंत्री पदाचे नाव कापून महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसचाच वरचष्मा; ठाकरे + पवार ब्रँडला धक्का!!