प्रतिनिधी
संभाजीनगर : शिवसेनेचे चिन्ह आणि मूळ नाव गोठवल्यानंतर पहिल्यांदाच मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारवर जोरजदार निशाणा साधला. या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आणि केवळ घोषणांची अतिवृष्टी असल्याची टीका केली. त्याचवेळी त्यांनी सरकारकडे ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे. Uddhav Thackeray’s Sharasandhan; Demand for compensation of 50 thousand per hectare
सरकारवर घणाघात
उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर येथील देहागाव येथे नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर टीका देखील केली. या निर्दयी सरकारमध्ये घोषणांची अतिवृष्टी आणि भावनांचा दुष्काळ आहे, असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
अन्न काय शिजवायचे हाच शेतक-यांपुढे प्रश्न
नैसर्गिक आपत्ती या आपल्या हातात नसतात पण ही संकटे आल्यानंतर सरकारचे कर्तव्य असते की शेतक-याला वा-यावर सोडायचे नाही. माझी आताची ही भेट प्रतिकात्मक आहे. सध्या आपण एका विचित्र अवस्थेत आहोत. एका बाजूला दिवाळी आहे तर दुसरीकडे शेतक-यांचे दिवाळे निघाले आहे. दिवाळीच्या सणात आपल्या घरात अन्न काय शिजवायचे असा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडला आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
Uddhav Thackeray’s Sharasandhan; Demand for compensation of 50 thousand per hectare
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे यांच्या आजच्या मराठवाडा दौऱ्यापूर्वी आणि दौऱ्यानंतर राजकारण बेरजेचं की वजाबाकीचं?
- ऐतिहासिक ताजमहाल होणार अतिक्रमण मुक्त; सीमेअंतर्गत 500 मीटर व्यवसाय बंदी करणार लागू
- गुमनामी बाबा की नेताजी? : गुमनामी बाबांचा DNA रिपोर्ट सार्वजनिक करायला केंद्रीय फॉरेन्सिक लॅबचा नकार
- फोडा – फोडी, बुडवा – बुडवी राजी – नाराजी; ही तर महापालिका निवडणुकांपूर्वीची खडाखडी