• Download App
    ठाकरेंची नवी घोषणा, आता जिंकेपर्यंत लढायचं!!; पण जिंकल्यानंतर काय करायचं??; हा खरा प्रश्न!!Uddhav Thackeray's new slogan fight till win, will he remain committed after winning with Congress - NCP?

    ठाकरेंची नवी घोषणा, आता जिंकेपर्यंत लढायचं!!; पण जिंकल्यानंतर काय करायचं??; हा खरा प्रश्न!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडून सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे बऱ्याच महिन्यांनी मातोश्री बाहेर पडून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गेले आहेत. तिथे त्यांच्या जाहीर सभेत “आता जिंकेपर्यंत लढायचं,” अशी नवी घोषणा देण्यात आली आहे. या सभेच्या टीजर पासून प्रत्यक्ष सभास्थळापर्यंत “आता लढेपर्यंत जिंकायचं” हीच घोषणा गाजत आहे. पण या घोषणेमुळेच जिंकल्यानंतर काय करायचं??, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे!! Uddhav Thackeray’s new slogan fight till win, will he remain committed after winning with Congress – NCP?

    कारण हेच ते उद्धव ठाकरे आहेत, जे 2019 मध्ये भाजप बरोबरच्या युतीत जिंकेपर्यंत लढले होते. पण जिंकल्यानंतर मात्र त्यांनी भाजप बरोबरच्या युतीला टांग मारून काँग्रेस – राष्ट्रवादी बरोबर नवा घरोबा केला होता. तो त्यांचा राजकीय घरोबा आजही कायम आहे. या घरोब्यामुळेच त्यांना स्वतःच मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची सत्ता गमवावी लागली, इतकेच नाही तर आपल्या शिवसेना पक्षात उभी 3/4 फूट सहन करावी लागली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेतल्या जिंकेपर्यंत लढायचं. या घोषणेत नवीन काही नाही. ते नेहमीच जिंकेपर्यंत लढलेच आहेत. यात कोणतीही शंका नाही.


    ED Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या 6.45 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच; ठाण्यातील 11 फ्लॅट्सही जप्त


    पण प्रश्न त्या पुढचा आहे, तो म्हणजे जिंकल्यानंतर उद्धव ठाकरे काय करणार?? कारण 2019 मध्ये जिंकल्यानंतर भाजपबरोबर युती करून घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी वेगळा मार्ग पत्करला होता. तसंच आता देखील जिंकेपर्यंत लढून जिंकल्यानंतर ते तोच इतिहास पुन्हा रिपीट करणार का??, हा खरा प्रश्न आहे.

    उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस – राष्ट्रवादी बरोबर आहेत हे खरेच. त्यांची लढत समोरच्या शिंदे गट आणि भाजपशी आहे हेही खरे. त्यामुळे ते जिंकेपर्यंत लढतीलही पण जिंकल्यानंतर ते काँग्रेस – राष्ट्रवादी बरोबरच राहतील आणि पुन्हा एकदा भाजप बरोबर जाणार नाहीत, याची खात्री कोण देणार??

    Uddhav Thackeray’s new slogan fight till win, will he remain committed after winning with Congress – NCP?

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा