• Download App
    उद्धव ठाकरेंचा फुल्ल इमोशनल ड्रामा!!; "वर्षा" सोडली, पण मुख्यमंत्रीपद नाही!!; बंडखोरांच्या मूळ मुद्द्याला तर बगल!! Uddhav Thackeray's full emotional drama

    Watch : उद्धव ठाकरेंचा फुल्ल इमोशनल ड्रामा!!; “वर्षा” सोडली, पण मुख्यमंत्रीपद नाही!!; बंडखोरांच्या मूळ मुद्द्याला तर बगल!!

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह फुल इमोशनल ड्रामा करत वर्षा सोडण्याची तयारी दाखवली पण खर्‍या अर्थाने मुख्यमंत्रीपद नव्हे!! बंडखोरांनी मला उघडपणे समोर येऊन सांगावं मी ताबडतोब मुख्यमंत्रीपद सोडतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे पण माझेच शिवसैनिक माझ्यावर विश्वास दाखवत असतील तर उपयोग नाही असे सांगत मुख्यमंत्र्यांनी चतुराईने राजीनाम्याची नुसती घोषणा केली पण तो राजीनामा खिशात नव्हे तर टेबलावर ठेवला!! Uddhav Thackeray’s full emotional drama

    मला सत्तेचा मोहन आहे मुख्यमंत्रीपद काय पण मी शिवसेनेचे पक्षप्रमुख पण सोडायला तयार आहेत कोणाकडे किती आमदार या संख्येच्या बळावर मला जायचे नाही मला शिवसैनिकांनी समोर येऊन सांगावे तुम्ही मुख्यमंत्रीपदी आणि शिवसेना पक्ष प्रमुख पदी नको मी तात्काळ दोन्ही पदे सोडली असे सांगत प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पदे सोडलेली नाहीत उलट काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर आपले नाते यापुढे देखील टिकून राहणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.

    मला कोविड झाला आहे. त्यामुळे हा राजीनामा घेऊन बंडखोर आमदारांनी राज्यपाल महोदयांकडे जावे, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या बंडखोर आमदारांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला.

    – खिशात राजीनामे ते टेबलावर राजीनामा

    2014 नंतर फडणवीस मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. पण एकाही मंत्र्याने राजीनामा दिला नव्हता तसेच काहीसे आत्ता मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यांनी राजीनाम्याची नुसती घोषणा केली पण प्रत्यक्षात राजीनामा दिला नाही त्याउलट त्यांनी फक्त बंडखोर शिवसैनिक आमदारांना इमोशनल आवाहन केले आणि वर्षा सोडण्याचे जाहीर करून मातोश्री वर जायला निघत असल्याचे जाहीर केले.

    या सर्व प्रकारातून मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना बरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला खरा परंतु सर्व शिवसैनिकांचा आणि बंडखोर आमदारांचा मूळ मुद्दा काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संबंध तोडा भाजपशी युती करून सरकार बनवा हा मुद्दा मात्र पूर्णपणे टाळल्याचे फेसबुक लाईव्ह मधून दिसून आले आहे. उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बरोबर राहण्याची इच्छाच मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यातून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला आणि शिवसैनिकांना आणि बंडखोर आमदारांना जरी इमोशनल आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्री पद सोडण्याची इच्छा नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले आहे आपला भरवसा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावर कायम असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.

    शिवसेना आमदारांची मूळ तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी दाबून ठेवण्याची आहे राष्ट्रवादीला राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी आणि शिवसेनेच्या आमदारांवर पूर्ण न्याय ही तक्रार असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये त्या तक्रारीकडे पूर्ण दुर्लक्ष केले त्याचप्रमाणे हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे देखील त्यांनी फक्त उल्लेख करून प्रत्यक्षात मात्र बगल दिली आपल्या ऐवजी शिवसेनेचा दुसरा मुख्यमंत्री बसविण्याची तयारी त्यांनी दाखवली पण स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मात्र त्यांनी दिलेला नाही.

    Uddhav Thackeray’s full emotional drama

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!