मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी फेसबुक लाईव्ह केले. ते काय बोलले कोणालाच समजले नाही अशी टीका केली जात असली तरी त्यांनी संभ्रम मात्र निर्माण केला. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांतील गोरगरीब मजुरांमध्ये धास्ती पसरली आहे. मजूर शहर सोडून जाऊ लागल्याने उद्योग-व्यवसाय ठप्प पडण्याची भीती आहे.Uddhav Thackeray’s Facebook Live confusion, thousands of workers left the city in fear
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी फेसबुक लाईव्ह केले. ते काय बोलले कोणालाच समजले नाही अशी टीका केली जात असली तरी त्यांनी संभ्रम मात्र निर्माण केला. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांतील गोरगरीब मजुरांमध्ये धास्ती पसरली आहे. मजूर शहर सोडून जाऊ लागल्याने उद्योग-व्यवसाय ठप्प पडण्याची भीती आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवायचे यावरून राज्य सरकार भंजाळले आहे. त्याच अनुषंगाने उध्दव ठाकरे यांनी शनिवारी फेसबुक लाईव्ह केले. सगळ्या वाहिन्यांनी ते थेट प्रक्षेपित केले.
मुख्यमंत्री काय बोलले,कोरोनावर काय उपाययोजना करणार हे कोणाला समजलेच नाही, असे बोलले जात आहे. मात्र, महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागणार अशी धास्ती परप्रांतिय मजुरांनी घेतली. त्यामुळे हजारो मजूर आपल्या गावी परतू लागले आहेत.
मुंबईत एलटीटी, दादर आणि सीएसएमटी स्टेशनवरून रोज ५० रेल्वे गाड्या उत्तरेत जातात. या तिन्ही स्टेशनवर शनिवारी संध्याकाळपासूनच मजुरांची गर्दी आहे. एलटीटी स्टेशनातून दैनंदिन २० गाड्या जातात.
सध्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या ६० टक्के प्रवासी क्षमतेत चालवल्या जात आहेत. रविवारी संध्याकाळी मुंबईत टाळेबंदीची घोषणा होणार आहे, अशी भीती अनेक मजुरांना होती. या मजुरांच्या जाण्याने मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील सगळ्याच शहरांतील उद्योगांना फटका बसणार आहे.
Uddhav Thackeray’s Facebook Live confusion, thousands of workers left the city in fear