नाशिक : एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेला खिंडार पाडले नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुहेरी धोरण अवलंबले असून एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे शिष्टाई साठी मिलिंद नार्वेकर रवींद्र फाटक यांच्यासारख्या मोहऱ्यांना सुरतला पाठवले आहे. मात्र त्याच वेळी एकनाथ शिंदे यांनी पाठवलेला प्रस्ताव धुडकावत उलट त्यांनाच शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदावरून दूर केले आहे. यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या विषयी नेमका काय निर्णय घ्यायचा आहे हे स्पष्ट दिसत आहे. Uddhav Thackeray’s double standard; On the one hand, Eknath Shinde has Narvekar for discipline
एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असलेल्या आमदारांचा संख्येमुळे ठाकरे – पवार सरकार अल्पमतात आल्याची पक्की जाणीव उद्धव ठाकरे यांना झाली आहे आणि त्यामुळेच त्यांच्याकडे शिष्टाई साठी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना त्यांनी पाठवले आहे.
शिवसेनेला खिंडार : चमत्कारात मूळच्या जळगावच्या पाटलांचा मोठा वाटा!!
पण त्याच वेळी शिवसैनिकांना शिवसैनिकांचे जुन्या पद्धतीने मनोधैर्य टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेते पदावरून हटवून आपला खरा मनसूबाही स्पष्ट केल्याचे दिसत आहे. शिवसेनेत ठाकरे परिवार कोणत्याही कितीही मोठ्या नेत्याचे बंड सहन करत नाही हा तो खरा मनसुबा आहे आणि तोच संदेश उद्धव ठाकरे देऊ इच्छित आहेत.
संजय राऊत यांची बॉडी लँग्वेज
दुसरीकडे रोज पत्रकार परिषदांमध्ये एकाचढ एक बाता करणारे संजय राऊत यांची आज दिवसभरातली बॉडी लँग्वेज बरीच “पॅसिव्ह टेन्स”मध्ये गेलेली दिसली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी आहेत. त्यांना आम्ही मुंबईत बोलावून त्यांच्याशी चर्चा करू, वगैरे म्हणत आहेत. पण त्याच वेळी त्यांचे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली. या मुद्द्यावर संजय राऊत यांच्याकडे त्यांच्याकडे उत्तर नव्हते.
Uddhav Thackeray’s double standard; On the one hand, Eknath Shinde has Narvekar for discipline
महत्वाच्या बातम्या
- विधान परिषद निवडणूक : इंदिराजी – राजीवजींच्या काळातले “द्रष्टेपण” 2022 मध्ये सिद्ध!!
- महाविकास आघाडीत असंतोषाचा स्फोट; भाजपला विधानसभेत 134 आमदारांचे मताधिक्य!!
- विधान परिषद निवडणूक : फडणवीसांची चाणक्यगिरी; तिघांचे भांडण एकाचा लाभ!!
- विधान परिषद : महाविकास आघाडीला फडणवीसांचा पुन्हा धोबीपछाड; काँग्रेसचे भाई जगताप पराभूत भाजपचे प्रसाद लाड विजयी!!