प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना आणि ठाकरे हे नाते भाजपाला संपवायचे आहे. म्हणून काही मंडळींना हाताशी धरून त्यांनी घाट घातलाय. ज्यांना शेंदूर लावला तेच लोकं आता शिवसेना गिळायला निघाले आहेत. भाजपला अंदाज नाही, कोणत्या शक्तीसोबत त्यांनी पंगा घेतला आहे. त्यांच्यात जर खरेच मर्दुमकी असेल तर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न लावता स्वतःच्या नावावर मते मागावीत, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी बंडखोरांना दिले.Uddhav Thackeray’s attack The Shiv Sena is going to swallow those who put it on fire; No bouquets, bring affidavits and bundles of membership registration!
शिवडी विधानसभा मतदारसंघातील काळबादेवी येथील सेनेच्या शाखा उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. या वेळी सुभाष देसाई, अनिल देसाई, अरविंद सावंत, सचिन अहिर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘जे बाहेर पडलेत त्यांना आम्ही गद्दार बोललो नाही, उलट त्यांनी स्वत:च्या कपाळावर स्वत: तो शिक्का मारून घेतला आहे. भाजपला शिवसेना संपवायची आहे. शिवसेना आणि ठाकरे हे नाते संपवायचे आहे. मुंबईवरचा भगवा शिक्का पुसून स्वतःचा शिक्का उमटवायचा आहे. पण ते सोपे नाही. जे गेलेत त्यांच्यासोबत कोणी नाही. कारण त्यांना असामान्य बनवणारा शिवसैनिक आज आमच्यासोबतच आहे.’
पुष्पगुच्छ नको, शपथपत्र-सदस्य नोंदणीचे गठ्ठे घेऊन या!
‘आता पुन्हा सामान्यांतून असामान्य बनवायचे आहे. 27 तारखेला माझा वाढदिवस आहे. या दिवशी माझ्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन येऊ नका, तर शपथपत्र आणि सदस्य नोंदणीचे गठ्ठे घेऊन या,’ असे आवाहन उद्धव यांनी केले. जे गेलेत त्यांनी शिवसेनाप्रमुखांचा म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो न वापरता स्वतःच्या नावाने लोकांमध्ये जावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. काळबादेवी येथील शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
बंडखोरांनी स्वत:च्या कपाळावर गद्दारीचा शिक्का मारून घेतला
समोरच्यांनी प्रोफेशनल एजन्सी नेमल्या आहेत. त्यांना पैसा, तर आपली निष्ठा अशी लढाई आहे. आदित्य महाराष्ट्रात फिरतोच आहे. मीदेखील आता उतरणार आहे. लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होते आहे. गणपती बाप्पा हे अरिष्ट लवकरच तोडून मोडून फेकून देईल आणि शिवसेनेचा भगवा केवळ महाराष्ट्रावरच नाही तर संपूर्ण देशावर फडकेल, असा विश्वासही उद्धव यांनी व्यक्त केला.
मराठी माणसाला, हिंदुत्वाला तोडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे. दोन शब्दात सांगायचे झाले तर शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते, तर भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करतो. पण सर्वसामान्य शिवसैनिक आमच्यासोबत आहे, असे ते म्हणाले.
Uddhav Thackeray’s attack The Shiv Sena is going to swallow those who put it on fire; No bouquets, bring affidavits and bundles of membership registration!
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे : खास सामना मुलाखतीतून उरलेली शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न!!
- 6 राज्यांमध्ये कोरोनाचा धोका : गेल्या 24 तासात देशात 19,100 नवीन रुग्ण, महाराष्ट्र-केरळनंतर बंगाल-ओडिशामध्ये संसर्ग वाढला
- रोहित पवार : 2024 नंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वात करायला गेले “बदल”; आता मात्र खुलाशाची धावपळ!!
- हर घर तिरंगा : ध्वज संहितेत मोठा बदल; घरोघरी रात्रंदिवस फडकू शकतो तिरंगा!!