विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेतले विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला द्या, नाहीतर उपमुख्यमंत्री पद रद्द करा, असे वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला खरा, पण प्रत्यक्षात त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर घाव घातला.
वेगवेगळ्या पक्षातून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावेळी बोलताना त्यांनी विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदाचा विषय काढला. शिवसेनेचे फक्त २० आमदार असताना संपूर्ण महाविकास आघाडीच्या 49 आमदारांच्या बळावर उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्ष नेतेपद हवे आहे. परंतु, असे नियमात बसत नसल्याचे कारण दाखवत फडणवीस सरकारने ते पद निर्माण करणे टाळले आहे.
परंतु, उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांची राजकीय सोय लावण्यासाठी शिवसेनेकडे विरोधी पक्ष नेतेपद हवे आहे. परंतु, त्यांनी भाजपवर निशाणा साधताना प्रत्यक्षात घाव मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर घातला आहे. कारण सध्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असले तरी उपमुख्यमंत्री पदे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे आहेत.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीनुसार फडणवीसांनी खरंच उपमुख्यमंत्री पद रद्द केले, तर त्यातून भाजपच्या अंगावर कुठलाही राजकीय ओरखडा उठण्याची शक्यता नाही. उलट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाच त्याचा राजकीय फटका बसेल. पण उद्धव ठाकरे यांनी मागणी केली म्हणून भाजप असा उपमुख्यमंत्री पद रद्द करायचा कुठला निर्णय घेईल, असे उद्धव ठाकरेंना वाटत असेल, तर तीही सुतराम शक्यता नाही.
Uddhav Thackeray’s attack on Shinde +Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- पृथ्वीराज बाबांनी लावलेले जाळे फडणवीस यांनी तोडले; पण पण मुख्यमंत्रीपदासाठी हावरट झालेली राष्ट्रवादी त्यात अडकली!!
- Odisha Women : कर्नाटकातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची एक रजा मिळेल; वर्षातून अशा 12 सुट्ट्या
- Putin India visit : ट्रम्प टेरिफला वाटाण्याच्या अक्षता; रशिया बिनदिक्कत सुरू ठेवणार भारताला इंधन पुरवठा!!
- Putin : द फोकस एक्सप्लेनर : पुतिन यांची भारताला दोस्तीची हमी आणि पश्चिमेला बदलत्या शक्ती-संतुलनाचे संकेत