प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे मोदी विरोधकांच्या ऐक्याच्या बैठकीसाठी 14 पक्षांच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे पाटण्यात पोचले आहेत, तर त्याचवेळी भाजपने त्यांच्यावर औरंगाबाद की संभाजीनगर??, औरंगजेब की सावरकर??, अशा प्रश्नांचा भडीमार केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे देखील पोहोचले आहेत. या बैठकीत 15 पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. केंद्रातले मोदी सरकार हटवून तिथे विरोधकांची सत्ता आणण्याची खलबते सुरू आहेत, पण त्याचवेळी महाराष्ट्रात भाजपने उद्धव ठाकरे यांच्या समोर प्रश्नावली टाकली आहे.Uddhav Thackeray with leaders of 14 parties in Patna for opposition unity meeting
भाजपचे आमदार आणि विधानसभेतले प्रतोद ॲड. आशिष शेलार यांनी एक ट्विट करून उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारले आहेत.
हे ट्विट असे :
महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन उबाठाला थेट विचारतोय… ◆ औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर? ◆ उस्मानाबाद की धाराशिव? ◆ अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यानगर? ◆ काँग्रेस की हिंदुत्व? ◆ कबर की स्मारक? आणि ◆ औरंगजेब की सावरकर? म्हणून शब्दांची कोटी न करता.. मर्द, खंजीर… असले शब्द न वापरता… उबाठा प्रमुखांनी महाराष्ट्राला स्पष्ट शब्दात सांगावे… यापैकी नेमके काय? कि दोन्ही? नाही तर लहानपणीचा खेळ.. एवढं एवढं पाणी आणि गोलगोल “गाणी”
केंद्रातील मोदी सरकार ईडीसीबीआय सारख्या केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना त्रास देत असल्याचा आरोप आधीच सर्व विरोधी पक्षांनी केला आहे त्यात उद्धव ठाकरे आघाडीवर आहेत पण असे आरोप होऊनही ईडी आणि सीबीआयची कारवाई थांबलेली नाही.
ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे
उलट कोरोना काळात मुंबईत कोविड सेंटर उभारणीत 12500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याबरोबर ईडीचे लक्ष या घोटाळ्याकडे वळले असून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीने नुकतेच छापे घातले. त्यातून काही मालमत्ता आणि कागदपत्रे जप्त केली. यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण, संजीव जयस्वाल तसेच संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजित पाटकर यांचा समावेश आहे. ईडीच्या छाप्यांमधून अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे जरी विरोधकांच्या बैठकीला पाटण्यात पोचले असले तरी भाजपने मात्र त्यांच्यावर शरसंधान साधताना त्यांच्यावर हिंदुत्वाच्या प्रश्नावलीचा बाण सोडला आहे.
Uddhav Thackeray with leaders of 14 parties in Patna for opposition unity meeting
महत्वाच्या बातम्या
- साताऱ्यात दोन राजांच्या वादानंतर कराडमध्ये फडणवीसांची शिष्टाई; दोन तास चर्चा, वाद फार गंभीर नसल्याचा फडणवीसांचा निर्वाळा
- अभिमानास्पद : जोरदार वारा, मुसळधार पावसात वॉशिंग्टन विमानतळावर राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ मोदी भिजत उभे राहिले
- PM मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते का??; वाचा नेहमी “मोदी विरोधी” भूमिका मांडणाऱ्या न्यूयॉर्क टाईम्सचे विश्लेषण
- हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेर झाले PM मोदींचे चाहते, म्हणाले- पंतप्रधान भारतीय संस्कृतीचे प्रतीक