• Download App
    अदानी विरोधातील मोर्चात जाणे पवार गटाने टाळले; ठाकरेंनी काँग्रेस - वंचितशी स्वतंत्र संधान जुळवले!! Uddhav thackeray United shivsena + Congress + vanchit aghadi against adani, but left pawar faction alone in Mumbai politics

    अदानी विरोधातील मोर्चात जाणे पवार गटाने टाळले; ठाकरेंनी काँग्रेस – वंचितशी स्वतंत्र संधान जुळवले!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीत अदानी मुद्द्यावर काढलेल्या मोर्चात काँग्रेसला सामील करून घेतले. त्याचबरोबर त्यांनी दुसरीकडे “इंडिया” आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यासाठी विषय आघाडीच्या 19 तारखेच्या बैठकीत मांडण्याचे कबूल केले.Uddhav thackeray United shivsena + Congress + vanchit aghadi against adani, but left pawar faction alone in Mumbai politics

    यातून ठाकरेंनी दोन पक्षी मारले. महाविकास आघाडीतले आपले स्थान शरद पवारांपेक्षा मजबूत केले आणि पवार जरी अदानींच्या बाजूने उभे राहिले असले, तरी अदानी मुद्द्यावर आपण राहुल गांधींबरोबर आहोत, असा “संदेश” काँग्रेस श्रेष्ठींना देऊन काँग्रेसशी शिवसेनेची जवळीक वाढवली. यातून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत पवारांपेक्षा जास्त फायद्यात आल्याचे दिसत आहे.

    अदानीविरोधात उद्धव ठाकरे यांनी काल मोर्चा काढला. त्यात काँग्रेस सामील झाली, पण पवार गटाने पाठ फिरवली. याचे परिणाम ठाकरे – पवार संबंध आणि ठाकरेंच्या पुढच्या राजकारणावर उमटणार आहेत.

    मुंबई – ठाणे – नवी मुंबई आणि कोकण या पट्ट्यातल्या शिवसेनेच्या राजकारणाचा विचार केला, तर हे चित्र नेमकेपणाने स्पष्ट होईल.

    कोकणातला रायगड जिल्हा वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व फारसे बळकट नाही. त्यातही सुनील तटकरे अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर शरद पवार गटाकडे रायगड मधले नेमके नेते उरलेत कोण??, यावर प्रश्नचिन्ह लागलेच आहे. मुंबई – ठाणे आणि नवी मुंबई पट्ट्यात शिवसेने खालोखाल काँग्रेसच जास्त ताकदवान आहे. राष्ट्रवादीचे तिथले राजकीय अस्तित्व मुळातच तोळामासा आणि त्यातही फूट पडल्यानंतर शरद पवार गटाचे अस्तित्व अतिनगण्य!!, अशा स्थितीत धारावीच्या नेमक्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला आपल्या मोर्चात घेऊन स्वतःचे महाविकास आघाडीतले स्थान बळकट करून घेतले आहे.

    वास्तविक महाराष्ट्राच्या विधानसभेत काँग्रेस हाच पक्ष शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या पेक्षा प्रबळ आहे. कारण त्यांची आमदार संख्या या दोन्ही गटांपेक्षा जास्त आहे. पण मुंबई पट्ट्यातल्या राजकारणात “ठाकरे नावाचा फॅक्टर” हा काँग्रेसपेक्षा आणि पवारांपेक्षा अधिक बळकट आहे, हेच उद्धव ठाकरेंनी धारावीतल्या अदानीविरोधी मोर्चाच्या निमित्ताने दाखवून दिले.

    – वंचितला मधाचे बोट

    त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांनी आजच दिलेली माहिती अधिक महत्त्वाची आहे. “इंडिया” आघाडीची 19 डिसेंबरला बैठक होणार आहे. त्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचा “इंडिया” आघाडीत प्रवेश करण्याचा विषय आपण मांडू, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी आपल्याला दिल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

    या आश्वासनाप्रमाणे उद्धव ठाकरेंनी जर “इंडिया” आघाडीत वंचित आघाडीला घेण्याचा मुद्दा 19 तारखेच्या बैठकीत मांडला आणि तो काँग्रेसने मंजूर केला, तर मुंबई – ठाणे – नवी मुंबई आणि कोकणपट्ट्यात ठाकरे + काँग्रेस + वंचित आघाडी यांचे बेरजेचे राजकारण अस्तित्वात येईल आणि त्याचा फायदा निश्चितच “ठाकरे फॅक्टर”ला होईल.

    शिंदे – फडणवीस सरकारने ज्यावेळी मुंबई महापालिकेचे 1997 पासूनचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला, त्याचवेळी मुंबईत “ठाकरे फॅक्टर” पूर्ण संपवण्याचा विडा उचलल्याचे स्पष्ट झाले. पण शिंदे – फडणवीस यांच्या या मनसुब्याला काटशह देण्यासाठी उद्धव ठाकरेंना निश्चित स्वरूपाचे आणि ठोस पाऊल उचलणे भाग होते. ते पवारांच्या भरवशावर उचलणे त्यांना शक्य नव्हते. कारण पवारांचे राजकारण मूळातच भरवशाचे नाही. त्यातही पवारांवर भरवसा ठेवला, तरी त्यांची मुंबई – ठाणे – कोकणपट्ट्या तेवढी ताकदही नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी अदानी मुद्द्यावर धारावीत मोर्चा काढून त्या मोर्चात काँग्रेसला सामील करून घेतले आणि त्याच वेळी प्रकाश आंबेडकरांना “इंडिया” आघाडीचा दरवाजा आपण उघडून देऊ शकतो, असे मधाचे बोट लावून महाविकास आघाडीत स्वतःची ताकद वाढवून शरद पवारांच्या गटाला एकाकी पाडले.

    शरद पवारांच्या पक्षाचा “निकाल” निवडणूक आयोगात पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यावेळी पवारांची गत ठाकरेंसारखीच होणार, म्हणजे ठाकरेंनी जशी शिवसेना गमावली, तशी राष्ट्रवादी पवार गमावणार की ते टिकवणार??, हा यक्षप्रश्न पवारांसमोर असताना ठाकरेंनी धारावीच्या निमित्ताने अदानी मुद्द्यावर मोर्चा काढून ठाकरे + अधिक काँग्रेस हे कॉम्बिनेशन मुंबईत बसवण्याचा प्रयत्न केला आणि वंचितलाही इंडिया आघाडीत घेण्याचे मधाचे बोट लावून “ठाकरे फॅक्टर”चे स्थान मुंबई आणि परिसरातल्या राजकारणात पवारांपेक्षा बळकट केले.

    धारावीतल्या अदानी विरोधातल्या मोर्चाने उद्धव ठाकरे यांनी आपण कुटील डाव खेळण्यात पवारांपेक्षा कुठेही कमी नाही हे दाखवून दिले!!… अर्थात हे भाजप – शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बलाढ्य महायुती पुढे कितपत चालेल??, याविषयी शंका आहे, हा भाग अलहिदा!!

    Uddhav thackeray United shivsena + Congress + vanchit aghadi against adani, but left pawar faction alone in Mumbai politics

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!