• Download App
    उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची सूचना पवारांनी स्वयंस्फूर्तीने नव्हे, उद्धव यांच्याच सूचनेनुसार केली; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट|Uddhav Thackeray to become Chief Minister not spontaneously, but on Uddhav's own suggestion; Chief Minister's secret explosion

    उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची सूचना पवारांनी स्वयंस्फूर्तीने नव्हे, उद्धव यांच्याच सूचनेनुसार केली; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

    प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह शरद पवारांनी धरला होता, असा महाराष्ट्रात सार्वत्रिक समज आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी तो दृढमूल केला आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. स्वतः उद्धव ठाकरेंनीच पवारांकडे आपली माणसे पाठवून आपली मुख्यमंत्री पदावर वर्णी लावून घेतली, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला.Uddhav Thackeray to become Chief Minister not spontaneously, but on Uddhav’s own suggestion; Chief Minister’s secret explosion

    देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार फोन करून देशील उद्धव ठाकरेंनी त्यांचा फोन घेणे टाळले. याचे कारण त्यांना स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचे होते. दुसरे कोणतेच कारण त्यासाठी नव्हते, असेही एकनाथ शिंदे यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळा ट्विस्ट आणला.



    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले :

    उद्धव ठाकरे यांनी वारंवार चर्चा टाळली. देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार फोन केले होते. पण त्यांनी फोन घेणे टाळले. उद्धव ठाकरे यांनीच शरद पवारांकडे माणसे पाठवली आणि आपलेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी सूचवायला सांगितले होते.

    महाविकास आघाडी सरकार असताना अनेक प्रकल्प मुद्दामून रखडवले. यामागे उद्धव ठाकरेंचा अहंकारच होता. पण आमचं सरकार एक वर्ष पूर्ण करतंय. मी आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून आतापर्यंत आम्ही 350 ते 400 मोठे निर्णय घेतले. प्रत्येक कॅबिनेटमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा विचार आम्ही केला. वैयक्तिक कुणाला लाभ मिळेल, हे आम्ही पाहिले नाही.

    आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे लोकांच्या जीवनात काय बदल होईल, हाच उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून आम्ही वर्षभर काम करतोय यामुळे मागच्या अडीच वर्षात प्रकल्प बंद होते. बंद पाडले होते. सगळं थांबलं होतं. त्याला आम्ही चालना दिली.

    काही प्रकल्प जेव्हा डिले होतात, त्यामुळे लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. पण मोठ्या प्रणामावर आर्थिक भारही वाढतो. आम्ही आल्यानंतर हे सर्व स्पीडब्रेकर दूर केले. आणि एकामागोमाग अनेक निर्णय घेतले. त्यामुळे आम्ही विकास करतोय.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आम्हाला पाठबळ आहे. सहकार क्षेत्र अमित शहा साहेबांजवळ आल्यानंतर त्यांनी 10 हजार कोटी इन्कम टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला. आमचा प्रत्येक प्रस्ताव केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर होतो. पंतप्रधान मोदींचे लक्ष या आमच्या महाराष्ट्राच्या विकासावर आहे. यामुळेच अजित पवार आणि त्यांचे सहकारी आमच्या सोबत आले. म्हणूनच त्यांनी विकासाला साथ दिली आहे.

    राष्ट्रवादीत फोडाफोडी केली नाही

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही फोडाफोडी केली नाही. याबाबत अजितदादांनी स्पष्ट केलंय की शरद पवारांनीच निर्णय घेतला होता. 2017 ला, 2019 ला, त्यांनीच निर्णय घेतला होता. अजितदादा, छगन भुजबळ यांनी याबाबत स्पष्ट सांगितलंय. आता त्यावर आम्हाला काही सांगण्याची आवश्यकता उरली आहे, असं मला वाटत नाही.

    महाराष्ट्र नंबर 1 वर आहे. 1 लाख 18 हजार कोटींची परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मेट्रोची कामं बंद होती, ती सुरू झाली. मेट्रो 2 ए, मेट्रो 7 आदरणीय पंतप्रधान महोदयांनी त्याचं लोकार्पण केलं. नागपूर मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं.

    तिथंपण महाऱाष्ट्राचा विकास नको म्हणून विरोधकांनी खोडा घातला होता. त्यामुळे त्यांनी अहंकारामुळे आरेचे कारशेड थांबवलं. मेट्रो 3 थांबवली होती. आम्ही त्याचा स्पीडब्रेकर काढला. मुंबई पुणे सी लिंक, एमटीएचएल जिथे दोन तास लागतात तिथे आता 15 मिनिटे लागतील. शिवडी न्हावा शेवा प्रकल्पही सुरू होतोय. वर्सोवा ते विरार, मुंबई गोवा सिंधुदुर्ग अॅक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड त्याचं काम आम्ही हाती घेतोय.

    कोस्टल कोकणचंही काम आम्ही हाती घेतलंय. हे लोकांच्या फायद्याचं आहे. वेळ वाचणार, इंधन वाचणार, प्रदूषण कमी होणार, सगळं होणार. आज मेट्रोचं 337 किमीचं जाळं जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा रस्त्यावरची 60 ते 70 लाख वाहनं कमी होतील. लोकं आरामात मेट्रोतून प्रवास करतील. कार्बन इमिशन कमी होईल. लोक आपल्या घरी वेळ देऊ शकतील. ऑफिसमध्ये चांगल्याप्रकारे काम करु शकतील. हा फायदा जनतेला होणार.

     मुख्यमंत्री सहायता निधी

    महाविकास आघाडी सरकार असताना  मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून महाराष्ट्रातल्या जनतेसाठी अडीच वर्षात  26 कोटी नव्हे, फक्त 2 कोटी रुपये खर्च केले होते आणि आपण आता वर्षभरामध्ये 85 कोटी रुपये खर्च केले. कुणाची माझ्याकडे मागणी आली की मी कुठेही असलो तरी सही करतो. माझ्या एका सहीने कुणाचा जीव वाचतोय, तर मी का हात आखडता घेऊ?? त्यांच्याकडे पेनच नव्हते. मी दोन दोन पेन ठेवतो. शाई कधी संपते मला माहिती पडत नाही.

    Uddhav Thackeray to become Chief Minister not spontaneously, but on Uddhav’s own suggestion; Chief Minister’s secret explosion

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!