• Download App
    Uddhav Thackeray महाराष्ट्रात फक्त ठाकरे गॅरेंटी; उद्धव ठाकरेंचा मोदींच्या गॅरेंटीवर हल्ला; पण पवार + काँग्रेसची गॅरेंटी अलगद बाजूला!!

    महाराष्ट्रात फक्त ठाकरे गॅरेंटी; उद्धव ठाकरेंचा मोदींच्या गॅरेंटीवर हल्ला; पण पवार + काँग्रेसची गॅरेंटी अलगद बाजूला!!

    विशेष प्रतिनिधी

    नांदेड : महाराष्ट्रात मोदी गॅरेंटी नव्हे, तर फक्त ठाकरे गॅरेंटी चालते, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला जरूर चढवला, पण प्रत्यक्षात त्यांनी महाविकास आघाडीतल्या पवार आणि काँग्रेसलाच बाजूला सारून टाकले!!

    नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार मतदार संघात प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी तर मोदी आणि शाहंना सुनावत महाराष्ट्रात फक्त ठाकरे गॅरंटी चालते, असे ठणकावून सांगितले. पण यातून काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादीच टार्गेट झाले. कारण राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये बीकेसी मध्ये काँग्रेसने स्वतःची गॅरेंटी जाहीर केली, त्याला ठाकरे आणि पवार उपस्थित ठेवले होते, पण उद्धव ठाकरेंनी नांदेडमध्ये मात्र फक्त ठाकरे गॅरेंटीचा उल्लेख करून आणि काँग्रेसला बाजूला सारले.

    उद्धव ठाकरे म्हणाले :

    निवडणुकीच्या वेळी मोदी – शाहंना महाराष्ट्राची आठवण झाली. राज्यातले उद्योग पळवताना त्यांना महाराष्ट्र आठवला नाही का? महाराष्ट्राला लुटायचं हेच त्यांचे काम होते. त्यांनीच सगळे उद्योग लुटून गुजरातला नेले. आता निर्लज्जपणे महाराष्ट्रातल्या जनतेकडे मतं मागता. तुम्ही वाट्टेल ते कराल आणि तुम्हाला महाराष्ट्र मत देईल या भ्रमात राहू नका.

    राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. जे मविआच्या विरोधात आहेत ते सर्व महाराष्ट्र द्रोही आहेत. हे सरकार सर्व सामान्य जनतेसाठी आणायचं आहे.


    Sanju Samson : संजू सॅमसनने डर्बनमध्ये शतक झळकावून इतिहास रचला


    भाजपने आता बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली आहे. कोणाला सांगताय बटेंगे तो कटेंगे. कोणाला शिकवतायत बटेंगे तो कटेंगे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मोदी शाह यांना केला. तुमचा पक्ष फुटत चालला आहे. आधी तुम्हाला सर्वजण मोदी भाई छे… अमित भाई छे… असे म्हणायचे. पण आता तुमचेच लोक तुम्हाला छेछेछे… करायला लागले आहेत. भाजपमध्ये खरा काळोख आहे. पण खरा प्रकाश शिवसेनेची मशाल आणणार आहे.

    भाजपची वाढ आमच्यामुळे झाली. पण आमच्याच उरावर हे माणसं बसवत आहेत. अमित शाह यांच्याकडे दुसरे कोणते मुद्दे राहिले नाहीत. आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे असं ते मागेही म्हणाले होते. त्याचं उत्तर मी त्यांना लोकसभेलाच दिलं आहे. पण त्यांनी आता एक उत्तर द्यावं की त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे की नाही?? मोदींनी प्रचाराची सभा धुळ्याला घेतली. ते एक प्रकारे बरे झाले कारण महाराष्ट्रातील जनता त्यांना धुळ चारणार आहे.

    सध्या महायुतीच्या प्रचार सभांमध्ये बाळासाहेबांचे फोटो लावले जात आहेत. मोदींचा काही ठिकाणी दिसतो. अमित शाह यांचा तर दिसतच नाही. मोदींची गॅरेंटी आता राहिली नाही. नासकी, सडकी, गळकी अशी मोदी गॅरेंटी महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्रात फक्त एकच गॅरंटी चालते ती म्हणजे ठाकरे गॅरेंटी!!

    उद्धव ठाकरेंनी मोदी – शाहांना ठाकरे गॅरेंटी विषयी ठणकावून सांगितले, पण त्याचवेळी पवार आणि काँग्रेसची गॅरेंटी महाराष्ट्रात चालत नाही हे अधोरेखित केले.

    Uddhav Thackeray targets Modi guaranty

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सरन्यायाधीशांवरच्या बूट फेकीला देऊन राजकीय हवा काँग्रेस आणि पवारांचे नेते पोळ्या भाजताहेत पहा!!

    Sameer Wankhede : शाहरुख खानचे प्रॉडक्शन हाऊस व नेटफ्लिक्सला समन्स; समीर वानखेडेंच्या याचिकेवर दिल्ली HCने 7 दिवसांत मागितले उत्तर

    ब्रिटिश पंतप्रधानांच्या दौऱ्याचा महाराष्ट्राला फायदा; गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि विकासाच्या नव्या क्षितिजाकडे राज्याची वाटचाल!!