• Download App
    शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाने चोरले, पण त्यांना चोरी पचणार नाही; उद्धव ठाकरेंचा पत्रकार परिषदेत टोला Uddhav Thackeray targets modi government, election commission and eknath shinde at once

    शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाने चोरले, पण त्यांना चोरी पचणार नाही; उद्धव ठाकरेंचा पत्रकार परिषदेत टोला

    प्रतिनिधी

    मुंबई :  शिवसेने ठाकरे यांची की शिंदेंची??, याबाबत निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि शिंदे गट यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले असून लोकशाहीला श्रद्धांजली वाहायची का??, अशा शब्दांनी त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. Uddhav Thackeray targets modi government, election commission and eknath shinde at once

    त्याचबरोबर शिंदे गटाने बाळासाहेबांचे नाव चोरले. शिवसेना नाव चोरले आणि आता शिवसेनेचे मुख्य निवडणूक चिन्हही चोरले, पण त्यांना ही चोरी पचणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत दिला आहे.

    केंद्रीय निवडणूक आयोगाने  दिलेला निकाल उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका आहे. या निकालावर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे.

    – काय म्हणाले उद्धव ठाकरे?

    केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिलेला निर्णय हा आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू असताना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर घोषणा करायला हरकत नाही. 75 वर्षाचं स्वातंत्र्य संपवून आणि बेबंदशाहीला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारला न्यायालयामध्ये देखील हस्तक्षेप करायचा आहे म्हणजे मग लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची का??, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आजपर्यंत आपण अनेक उदाहरणे पाहिलेले आहेत की जिथे सरकारची दादागिरी चाललेली आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

    सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मी मधल्या काळातील आपल्याशी बोललो होतो की तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निकाल देऊ नये. पक्ष कोणाचा आणि निकाल कोणाच्या बरोबर आहे? हे जर का केवळ आणि केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवरती ठरवायला लागलो तर मग मात्र कोणी धनाढ्य माणूस निवडून आलेला आमदार-खासदार विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा होऊ शकतो. देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो.

    गद्दारांना मांडीवर घेतलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची स्वतः लढण्याची हिंमत नाही. मी अनेकदा त्यांना आव्हान दिले आहे की, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. अगदी लोकसभा पासून महापालिका तुम्ही एकटी निवडणूक घेण्याची काय त्यांची हिंमत झाली नाही. आता मला अशी शक्यता वाटायला लागलेले की ज्या पद्धतीने त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना हे मिंधे गटाला दिलेला आहे म्हणजेच असे की कदाचित येत्या महिन्यात दोन महिन्यांमध्ये निवडणुका सुद्धा जाहीर होऊ शकतील महापालिकेच्या

    तुम्ही आमच्यावरती कराल त्या प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. याची मला खात्री आहे. ठीक आहे, आजच्या पुरतं तरी त्यांनी धनुष्यबाण चोरलेला आहे. तो धनुष्यबाण कागदावरच आहे. ते चिन्ह आजही माझ्याकडे कायमचे माझ्याकडे राहणार आहे, तो तुम्हाला दाखवतोय एकूण काय की अनेकांना असं वाटलं असेल की आता शिवसेना संपली.

    शिवसेना ही अशी रेसिपी नाहीये. आजपर्यंत पहिल्या दिवसापासून जेव्हा सुद्धा आमच्याकडे एक निशाणी नव्हती हा धनुष्यबाण याचा उल्लेखनी कामगिरी करतो. तसा धनुष्यबाण त्याच्यावरचा कुंकू सुद्धा आपण पाहू शकता. हा शिवसेना प्रमुखांच्या देव्हाऱ्यातला आज सुद्धा आमच्या पूजेत असलेल्या धनुष्यबाण आहे आणि याची पूजा ही माननीय शिवसेनाप्रमुखांनी स्वतःच्या हाताने केलेली आहे. या धनुष्यबाणाचा तेज ती जी काय शक्ती आहे त्याला राहणार नाही. याची मला खात्री आहे मला विश्वास आहे



    असेल रावणाकडे पण धनुष्यबाण, असेल रामाकडे पण असेल, पण शेवटी विजय हा जसा रामायणमध्ये रामाचा झाला आणि 100 कौरव एकत्र आले म्हणून त्या पांडव हरले नव्हते. सत्याचा विजय नेहमी होत आलेला आहे आणि सत्याचाच विजय हा आता आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना आणि मी तमाम अन्यविरुद्ध अन्याय जो काही झालेला आहे अत्याचार होतो, हे लोकशाही वरती अत्याचार होतोय.

    मी मागे एकदा असं म्हटलं होतं की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. अंध धृतराष्ट्र नाही. तो आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा असं वस्त्रहरण कदापी खपवून घेणार नाही. या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत. आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा निकाल लागेलच आणि दुसरी जी अपात्रतेची केस ही तिथे चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जर घटना मानून निर्णय लागला तर अनेक घटना तज्ञांनी सांगितलेले की निर्णय काय लागणार

    शिवसेनेचे धनुष्यबाण शिवसेनाप्रमुखांचं आहे. तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला वाटत असेल आता तिकडे असेल, आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल. शेवटी तो चोर असतो. नामर्द चोरी करू शकतो म्हणून नामर्द कितीतरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही. हे सत्य आहे. त्याच्यामुळे आम्ही जोपर्यंत सुप्रीम कोर्टात जात नाही कारण आता शुक्रवार आहे लवकरात लवकर आम्ही जाणार. तोपर्यंत त्यांना धनुष्यबाणाची पेढे खाऊ द्या.

    बाकी आणखीन मला जे काय बोलायचं असेल ते येथे एक दोन दिवसांमध्ये मी वाटलं तर पुन्हा बोलेन, पण तूर्त मला असं वाटतं ही चोरी केलीय त्याला काही काळजी वाटत असेल. पण पचणार नाही. परत सांगतो की त्याला शिवसेना प्रमुखांचा फोटो चोरावा लागतोय. त्याला शिवसेना हे नाव चोरावे लागले. त्याला शिवसेनेचे धनुष्यबाण चोरावा लागला आहे. असे चोर कधीही मतदानातून निवडून येऊ शकत नाहीत. या नामर्दांना चोरी पचली असं वाटत असेल तरी ती तशी पचणारी नाही. जनता याचा पुरेपूर बदला कोणत्याही येणाऱ्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही.

    Uddhav Thackeray targets modi government, election commission and eknath shinde at once

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!