विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना अडचणी असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा आणि मगच निवडणुकीला सामोरे जा, असे आवाहन उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी करून शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर पेच टाकला. लोकसभा निवडणुकीच्या यशानंतरच्या पहिल्याच महाविकास आघाडीत पहिल्याच मेळाव्यात त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली.
स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीने आपला पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्याचे यजमानपद शिवसेनेकडे होते म्हणून उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात उद्घाटनाचे भाषण केले आणि भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली. उमेदवार जाहीर करण्याचे आत्तापर्यंत पवार आणि काँग्रेस यांनी टाळले. त्या उलट उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray दिल्लीत जाऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली होती त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हुरूप वाढला आणि त्यांनी पवार पृथ्वीराज बाबा यांच्यासमोर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा विषय काढला.
उद्धव ठाकरे म्हणाले :
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण होणार?? असे विचारले जात आहे. आजच्या मेळाव्यास पृथ्वाराज चव्हाण आहेत, शरद पवार आहेत. मी त्यांना सांगतो, आता मुख्यमंत्रीपदाचा जाहीर करा. मी तुम्हाला पाठिंबा देतो. कोणाचेही नाव जाहीर करा. मग उद्धव ठाकरे असो की अन्य कोणी, माझा पाठिंबा असणार आहे.
बऱ्याच दिवसांपासून आपल्या मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यायचे ठरत होते. आज योग जुळून आला आहे. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेत आहे. त्यांनी निवडणूक जाहीर करावी. आमची तयारी आहे. पण तयारी आहे, हे बोलायला सोपे आहे. मात्र, लढाई सोपी नाही. लोकसभेत आपण राजकीय शत्रूला पाणी पाजले. लोकसभेची निवडणूक ही संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाची होती.
तू राहील नाही तर मी राहील
आता महाराष्ट्र धर्म वाचवण्याची, महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवण्याची लढाई आहे. तू राहील नाही तर मी राहील या जिद्दीने निवडणूक लढायला पाहिजे. पण हे आपल्यात व्हायला नको. त्यांच्याविरोधात आपल्याला लढायचे आहे, जे महाराष्ट्र लुटायला आले आहेत. आपली आघाडी आधीपासूनच आहे. सरकारला आता जाग आली आहे. काही केले पाहिजे असे त्यांना आता वाटत आहे. ते डुबक्या मारून पवित्र होता येईल का? असे बघत आहेत. रक्षाबंधनात स्वत:चे फोटो छापत आहेत. पुढच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आम्ही आहोतच. मी पण महाराष्ट्राचे हित जपू. उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल. पण त्यांना झोपवू याची शपथ आज घ्या!!
मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आता जाहीर करा. शरद पवार आणि पृथ्वीराजजी तुम्ही जाहीर करा. मी पाठिंबा देईन. मी माझ्यासाठी लढत नाही. मी मुख्यमंत्रीपद सोडले ते महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्र झुकवण्याची कोणाची हिंमत होणार नाही. जो महाराष्ट्राला झुकवण्याचे काम करतो त्याला गाडून टाकतो. आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा. मी पाठिंबा देतो. जो अनुभव भाजपच्या युतीत घेतला. त्याची पुनरावृत्ती नको. २० आणि २५ वर्ष आमची युती होती. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण होते. त्यावेळी एकमेकांच्या पायावर धोंडे पाडले जात होते. पाडापाडीचे राजकारण व्हायचे. पण आता ते करू नका.
Uddhav Thackeray statement in mumbai meeting
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi : विकसित भारताचा संकल्प ते वैद्यकीय शिक्षणाच्या वाढीव 75000 जागा; लाल किल्ल्यावरून काय म्हणाले मोदी??; वाचा!!
- Sheikh Hasina : पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतरही शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ
- Govind Mohan : वरिष्ठ आयएएस अधिकारी गोविंद मोहन यांची केंद्रीय गृहसचिव म्हणून नियुक्ती!
- Vinesh Phogat : CASने विनेश फोगटची केस फेटाळली, रौप्य पदक मिळणार नाही!