विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेत एकीकडे यशवंत जाधव, अनिल परब, आदींचे हजारो कोटींचे घोटाळे बाहेर येत असताना त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना मराठवाडा आणि विदर्भातील लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत. Uddhav Thackeray Shivsena MPs: Ignore scams; Uddhav Thackeray orders all MPs to pay attention in Marathwada-Vidarbha !!
आज रविवारी बऱ्याच दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी घरात राहूनच शिवसेनेच्या सर्व खासदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या संवादात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्द्यापासून ते एमआयएम पक्षाशी आघाडी करण्यापर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली आहे. केंद्रीय तपास संस्था राजकीय हेतूनेच आपल्या मागे ससेमिरा लावत असल्याचे आरोप त्यांनी पुन्हा एकदा केले. पण त्या आरोपांकडे आणि कोर्टाने दिलेल्या विविध आदेशांकडे दुर्लक्ष करून उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना जिथे शिवसेना कमकुवत आहे, त्या मराठवाडा आणि विदर्भातील मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत.
औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणाऱ्या एमआयएम पक्षाशी आघाडी करणार नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने आम्हाला शिकवू नये. भाजपचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरते मर्यादित आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
– एमआयएम राष्ट्रवादी आघाडी
एमआयएम पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची दाट शक्यता असून मराठवाड्यात आणि विदर्भात तसेच मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना मराठवाडा आणि विदर्भात लक्ष केंद्रित करण्याचे आदेश काढून त्यांना एक राजकीय टार्गेट देऊन ठेवले आहे.
Uddhav Thackeray Shivsena MPs: Ignore scams; Uddhav Thackeray orders all MPs to pay attention in Marathwada-Vidarbha !!
महत्त्वाच्या बातम्या
- बीटकाॅईन गुन्हयातील सायबर तज्ञ आराेपींवरील एमपीआयडी कलम रद्द
- Pakistan Military Coup : पाकिस्तानात कोणत्याही क्षणी इम्रान खानचा तख्तापलट!!; लष्कर प्रमुख बाजवा ऍक्टिव्हेट!!
- डॉ.बलजीत कौर यांना ‘आप’ चा नियम नाही?
- Kirit Somaiya – Yashwant Jadhav : यशवंत जाधवांचा 1000 कोटींचा घोटाळा, 36 इमारतींची खरेदी, पण कोणत्या?; किरीट सोमय्यांच्या आरोपातून खुलासा!!