विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीतले जागावाटप चर्चेच्या गॅसवर “शिजवत” ठेवून उद्धव ठाकरेंनी अखेर उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली. मशाल चिन्हावरच्या 65 उमेदवारांची यादी त्यांच्या पक्षाने जाहीर केली.
महाविकास आघाडी अजूनही जागा वाटपाची चर्चा सुरूच आहे. तीन पक्षांमध्ये वाद अजून मिटलेले नाहीत. नाना पटोले, संजय राऊत, शरद पवारांना भेटीला गेल्याची बातमी मराठी माध्यमांनी चालविली आहे, पण दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरेंनी आपल्या हाताशी असलेल्या 65 जागांवर मशाल चिन्हावरचे उमेदवार जाहीर करून टाकले.
2019 मध्ये शिवसेनेची 56 आमदार निवडून आले होते. त्यापैकी फक्त 16 आमदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले. त्यापैकी अजय चौधरींचा उमेदवारीचा वाद अजून सुटलेला नाही. याचा अर्थ उद्धव ठाकरे यांनी तब्बल 50 नवे उमेदवार एका झटक्यात दिले आहेत. पण काँग्रेस आणि शरद पवारांनी मात्र अजूनतरी उमेदवार यादी जाहीर केलेली नाही.
Uddhav Thackeray shivsena declared candidatea
महत्वाच्या बातम्या
- yashomati Thakur : मुख्यमंत्रीपदासाठीच काँग्रेसने शिवसेनेला धरले ताणून; पण काँग्रेसच्या विदर्भातल्या महिला नेत्याने दिला उद्धव ठाकरेंनाच
- Modi governments : ‘आरोग्य विमा’धारकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा
- Delhi Police : रोहिणी बॉम्बस्फोट प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई!
- Elon Musk : एलन मस्क म्हणाले- EVM मुळे निवडणुकीत हेराफेरी होते, बॅलेट पेपरद्वारे मतदानाचा दिला सल्ला