• Download App
    उद्धव ठाकरे म्हणतात : भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडेच!|Uddhav Thackeray says Run away with as many arrows as you can, the bow is with me!

    उद्धव ठाकरे म्हणतात : भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडेच!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना संपवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. ही फूट बंडखोरांनी पाडली नाही तर ती भाजपने पाडली आहे. पण तुम्ही आमच्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण ते बाण चालवण्यासाठी धनुष्य तर लागेल ना? तो धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा, असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता.19) भाजपला दिला.Uddhav Thackeray says Run away with as many arrows as you can, the bow is with me!

    उत्तर भारतीय एकता मंचच्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. एक मेला की दुसर्‍याला जेलमध्ये टाकायचं, हा भाजपचा अनेक दिवसांपासूनचा डाव आहे. अशा पद्धतीने भाजपला शिवसेना संपवायची आहे. पण तुम्ही सतर्क राहा. आम्ही ठाकरे आहोत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करायचा हा आमचा पिंड आहे. संघर्षाला ठाकरे घाबरत नाहीत.



    आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीशी

    उत्तर भारतीय एकता मंचच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना भवन येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मागील 32 वर्षे आम्ही शिवसेनेसोबत आहोत. सध्या शिवसेनेचा कठीण काळ सुरू आहे. पण या संकटाच्या काळात आम्ही ठामपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, अशी ग्वाही एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

    Uddhav Thackeray says Run away with as many arrows as you can, the bow is with me!

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस