• Download App
    महाराष्ट्रातल्या समाजवाद्यांनी दिलेली फुले पगडी उद्धव ठाकरेंनी हातात घेतली डोक्यावर नाही घातली; म्हणाले...!! uddhav thackeray samajwadi party programme

    फुले पगडी झेपायला तेवढे डोके लागते; उद्धव ठाकरेंचा टोला!! पण कोणाला??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे किंवा देशातल्या इंडिया आघाडीचे काय व्हायचे ते होवो, आपण आपली बाजू मजबूत करून ठेवावी, या इराद्याने उद्धव ठाकरेंनी आधी प्रकाश आंबेडकरांशी युती करून ठेवली आणि आता महाराष्ट्रातल्या जुन्या समाजवादी पक्षाला जवळ केले. uddhav thackeray samajwadi party programme

    या समाजवादी पक्षाचा उत्तर प्रदेश मधल्या मुलायम सिंग आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची काहीही संबंध नाही. महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीतल्या वेगवेगळ्या 21 संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत महात्मा फुलेंची पगडी घालायचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरेंनी ती पगडी हातात घेतली. डोक्यावर नाही घातली आणि म्हणाले, “मीच समाजवाद्यांना म्हटले महात्मा फुलेंची पगडी माझ्या हातात द्या. डोक्यावर घालू नका. कारण ती झेपायला तेवढे डोके पाहिजे. टोपी खाली काय आहे??… पण काहींना डोकीच नसतात. पण तुम्ही मला आपले कुटुंब प्रमुख म्हणून माझ्याकडे आलात हे मी माझे भाग्य समजतो. आपल्याला केडरच पाहिजे. नुसते नेते काय उपयोगाचे?? मला शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे लोकांना आवडावे म्हणून तू खोटे मुखवटे घालू नकोस. शिवसेना प्रमुख आणि जॉर्ज फर्नांडिस एकत्र आले होते आणि त्यांनी मुंबईत मोठे परिवर्तन घडविले होते, याची आठवणही उद्धव ठाकरेंनी सांगितली.

    पण उद्धव ठाकरेंनी महात्मा फुलेंची पगडी हातात घेतली. डोक्यावर नाही घातली. या राजकीय कृतीतून त्यांनी शरद पवारांना टोमणा हाणल्याची चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी अखंड असताना शरद पवारांनी पुण्यातल्याच कार्यक्रमात इथून पुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात महात्मा फुलेंची पगडी द्यायची. पुणेरी पगडी नाही द्यायची, असे उद्गार काढून पुणेरी पगडी हे “प्रतिगामित्वाचे” लक्षण असल्याचे सूचित केले होते.

    पण नंतर त्याच शरद पवारांनी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वतः स्वीकारला. आणि 2023 मध्ये तर लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमाला कार्यक्रमात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. उद्धव ठाकरेंनी महात्मा फुलेंची पगडी हातात घेऊन फुले पगडी झेपायला तेवढे डोके लागते, असे सांगून पवारांनाच टोमणा हाणल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    uddhav thackeray samajwadi party programme

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!