नाशिक : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शिवसैनिक संताप उसळला असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एक वेगळाच मुद्दा मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उपस्थित केला होता. तो म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधले जे मंत्री बंडखोर होऊन आसाम मधल्या गुवाहाटीला गेले आहेत, त्यांना मंत्रीपदावरून काढण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव दबाव आणलाच्या बातम्या होत्या.Uddhav Thackeray retains 6 rebellion ministers, but only to handover their charge to another ministers
परंतु उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातल्या 6 बंडखोर मंत्र्यांवर त्यांना काढून टाकण्याची कारवाई करण्याऐवजी फक्त त्यांचा कार्यभार काढून तो दुसर्या मंत्र्यांकडे सोपवण्याचा हालचाली सुरू केल्याची बातमी आहे. हा सरळ सरळ राष्ट्रवादी काँग्रेसला काटशह असल्याचे मानले पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसने अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात आरोप झाल्यानंतर त्यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा जरूर घेतला. पण हाच न्याय राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्या बाबत अजूनही लावलेला नाही. नबाब मलिक यांच्यावर तर थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रीग केल्याचा आरोप आहे आणि त्या आरोपाखाली ते सध्या जेलची हवा खात आहेत. इतके होऊनही राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना मंत्रीपदावरून हटवलेले नाही. त्यांचा कार्यभार सोय म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिला आहे.
मात्र, शिवसेनेच्या मंत्र्यांनी बंडखोरी करताच त्यांना मंत्रिमंडळातून यासाठी राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणत होते. पण आता या दबावाला झुगारत उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांचे मंत्रिपद न काढून घेतात त्यांचा कार्यभार शिवसेनेतल्या दुसऱ्या मंत्र्यांकडे देण्याच्या ठरवल्याच्या बातम्या आहेत. हाच राष्ट्रवादीच्या दबावाला झुगारून काटशह देण्याचा प्रकार मानला पाहिजे.
कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा हा दबाव उद्धव ठाकरे यांनी झुगारला नसता तर आधीच मंत्रिमंडळातले कमी झालेले शिवसेनेचे बळ आणखी कमी झाले असते. शिवाय जसे नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेसला ते पद अजून मिळू शकले नाही. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहेत. तशीच अवस्था शिवसेनेची झाली असती. शिवसेनेतून दुसऱ्या आमदारांना मंत्री करायला राष्ट्रवादी काँग्रेसने खोडा घातला असता. येथे उद्धव ठाकरे यांनी या क्षणी तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला मागे सारून शिवसेनेची राजकीय साख टिकवल्याचे दिसून येत आहे.
त्याचबरोबर गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे गुलाबराव पाटील दादा भुसे बच्चू कडू आदी मंत्र्यांना मंत्रिपद टिकवण्याची लालूच दाखवली असे यातून मांडण्यात येत आहे आता एकनाथ शिंदे यांचा गट उद्धव ठाकरे यांच्या या खेळीला नेमके कसे उत्तर देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Uddhav Thackeray retains 6 rebellion ministers, but only to handover their charge to another ministers
महत्वाच्या बातम्या