एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर आणि त्यांना मिळालेल्या जवळपास 45 आमदारांच्या पाठींब्याने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सध्याचे राजकीय स्टेटस उरले आहे, ते म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उरलेले अल्पमताताले मुख्यमंत्रिपद!! Uddhav Thackeray remains chief minister of only NCP and Congress
उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. ही वस्तुस्थिती आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांची त्यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यावी, अशी अजिबात मागणी नाही. पण त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बरोबरचे संबंध तोडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी पुन्हा युती करावी, असा बंडखोर आमदारांचा आग्रह आहे. फेसबुक लाईव्ह नंतर स्वतः शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे तसेच जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते ज्या पद्धतीने “वर्षा” बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत, त्यातूनच हे 100% अधोरेखित होते की उद्धव ठाकरे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री उरले आहेत!!
– एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लालूच
त्यांच्यावर शिवसेनेच्या कोणत्याच आमदारांचा खऱ्या अर्थाने विश्वास उरलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून थेट एकनाथ शिंदे यांना घरी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असली तरी त्यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्याबरोबरचे संबंध तोडायची तयारी नाही हेच दाखवून दिले आहे. त्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांची “वर्षा” बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे याचाच अर्थ राष्ट्रवादीच्या ट्रॅपमध्ये मुख्यमंत्री अडकल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.
– शिवसेनेत उरले पवारनिष्ठ!!
शिवसेनेतून स्वतः मुख्यमंत्री आणि संजय राऊत सोडले तर बाकीच्या नेत्यांना तसेही मत व्यक्त करायची बंदी आहे. त्यामुळे ते कोणीच बोलत नाहीत. पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही थेट पवारनिष्ठ शिवसैनिक असल्यासारखेच भाष्य करताना दिसत आहेत. शिवसेनेच्या आमदारांच्या निधी वाटपाच्या मागणीवर तर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह मधून चकार शब्द काढला नाही.
त्यांनी हिंदुत्वावर जरूर भाष्य केले. परंतु, एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या हिंदुत्वाच्या मागणीसंदर्भात पूर्णपणे वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि आता तर राष्ट्रवादीच्या चौकडीने त्यांना थेट “वर्षा”वर घेरले असेच दिसून येत आहे.
– कुर्हाडीचा दांडा गोतास काळ
एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना सौम्य शब्दात करतांना त्यांनी कुर्हाडीचा दांडा गोतास काळ असा वाक्प्रचार वापरून डिवचले देखील आहे. आपल्याकडे संख्याबळ उरलेले नाही याची पक्की जाणीव मुख्यमंत्र्यांना आहे. त्याहीपेक्षा ती शरद पवारांना आहे. तरी देखील आपण 2019 सारखा काहीतरी गेम करू शकू अशा हेतूने शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचे दिसत आहे.
– पवार वर्षावर उद्धव ठाकरेंच्या भेटीला
शरद पवार मुख्यमंत्र्यांना नंबर गेम मध्ये मदत करण्याच्या ऑफरसह गेले असतील तर 2019 मध्ये जे घडले त्या पद्धतीचे घडवायची क्षमता शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे ठेवलेली नाही. हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असलेल्या आमदारांच्या संख्येवरून स्पष्ट होते आहे. शिवसेनेचे 35 आणि अपक्ष 10 असे 45 आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. अशा स्थितीत पवारांचा नंबर गेम हा फक्त मुख्यमंत्र्यांच्या इमोशनल ड्रामा या गोष्टीवर अवलंबून राहील. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे वर्षावर भेटायला जाणे यातून मुख्यमंत्र्यांचा आणि बंडखोर गटाच्या पॅचअपच्या प्रयत्नाला खो घालण्याचाच हा प्रकार असल्याचे दिसून येत आहे!!
Uddhav Thackeray remains chief minister of only NCP and Congress
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदेंचा गुवाहाटीतून शिवसेनेला जबरदस्त दणका; सुनील प्रभुंना हटवले, भरत गोगावलेंची प्रतोदपदी!!
- Eknath Shinde Profile : एकेकाळी रिक्षाचालक होते एकनाथ शिंदे, जाणून घ्या, कसे चमकले राजकीय पटलावर? दिग्गज नेते कसे बनले?
- शिवसेनेला खिंडार : “बाळासाहेब ठाकरे निष्ठ” शिवसेना गुवाहाटीत; “पवार निष्ठ” शिवसेना मुंबईत!! वाचा कोण कुणाला कसे समजवतेय??