• Download App
    Uddhav Thackeray: Alliance Talks with Raj Thackeray After Election Announcement उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले- निवडणूक जाहीर झाली

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले- निवडणूक जाहीर झाली की राज ठाकरेंसोबत चर्चा करू

    Uddhav Thackeray

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Uddhav Thackeray अनेक वर्षांनी आम्ही दोघे एका व्यासपीठावर एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. परंतु, त्यानंतर राज ठाकरे यांनी युतीबद्दल सावध भूमिका घेतली असून मराठीच्या मुद्यासाठी आम्ही एकत्र आलो असून यात राजकीय मुद्दा नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक जाहीर होऊ द्या, मग चर्चा करू शकतो.Uddhav Thackeray

    पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे  ( Uddhav Thackeray )यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, मी स्वतः पीक कर्ज मुक्तीची घोषणा केली होती. आम्ही सुरू केले तेव्हा सरकार पाडले गेले. मी अनुभव नसताना पहिल्या अधिवेशनात केले. तुम्ही मंत्री आहात, खाती असतात, अभ्यास कसला करत आहात कर्ज मुक्तीसाठी, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.Uddhav Thackeray



    माझा चेहरा हसराच असतो, मी रेडा कुठे कापला नाही

    माझा चेहरा हसराच असतो, मी रेडा कुठे कापला नाही, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले, आज अधिवेशन संपत आहे. 3 आठवड्याचे अधिवेशन होते. जनतेच्या समस्या संदर्भात प्रश्न होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण कसे होते, आईला मुलगा म्हणतो आईसक्रीम हवे आहे. आता काही होत नाही, भविष्यात हे होईल, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. पुरवण्या मागण्यावर जास्त भर दिला. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे, हे कर्ज कसे फेडणार? कर्ज कमी कसे करणार? योजनेचे काय? लाडका भाऊ-बहीण यांची उत्तरे आली नाहीत, अशी टीका ठाकरेंनी केली.

    कालच विधानभवनात हाणामारी झाली, अध्यक्षांनी उच्चस्तरीय चौकशी नेमली आहे. या गुंडांची इतकी हिंमत झाली आहे. मात्र धाडस झाले कसे? असा सवाल ठाकरेंनी केला. सत्तेच्या लालसेपोटी हे राजकारण सुरु आहे. हे सत्तेचे माजकारण आहे. चड्डी गॅंग माईक टाईसन समजतात. गळ्यात दात घालून फिरणारे कसे माजलेत. यांना कोणी जाब विचारणार की नाही असे ठाकरे म्हणाले.

    राष्ट्रपती राजवट लागू करावी

    पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, पीक विमा रद्द केला आहे. 3 हजार कोटींची चोरी सुप्रीम कोर्टाने पकडली, तरी चोर फिरतोय. विधानभवनात अशा घटना घडत असतील तर राष्ट्रपती राजवट लागू करावी. याला मी स्वप्न रंजन वाटीका म्हणतो. विरोधी पक्षनेता पाशवी बहुमत असताना देत नाही. अल्पमतातले सरकार मांडता येत नाही. व्यक्तीस्वातंत्र्य असल्याने त्रिभाषा सूत्र आणत आहे. मात्र, आम्ही तो आणू देणार नाही.

    Uddhav Thackeray: Alliance Talks with Raj Thackeray After Election Announcement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vijay Vadettiwar : आपणच मुख्यमंत्री होणार असे अनेकांना वाटले होते, विजय वडेट्टीवार यांचा नाना पटोले यांना अप्रत्यक्ष टोला

    डोक्यात हवा गेल्याची उद्धव ठाकरेंची कबुली, वडेट्टीवारांचा दुजोरा; पण काढणार कोण राहुल गांधींच्या डोक्यात गेलेली हवा??

    Vadettiwar : नाना पटोले यांना मुख्यमंत्र्यांनी धू धू धुतले तरी वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा ते आरोप केले