विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपने 430 जास्त उमेदवार जाहीर केले, पण काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीतल्या घटक पक्षांची मजल 300 उमेदवारापर्यंत पोहोचली नाही, तरी देखील त्यांच्यात पंतप्रधान पदाची शर्यत सुरू झाली. Uddhav thackeray PM, nana patole targets Sanjay and sharad pawar
एकीकडे काँग्रेस राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी उतावळी झाली असताना दुसरीकडे संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या नावाची रिंग पंतप्रधान पदाच्या शर्यतीत टाकली, वर शरद पवारांचाही उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा असल्याचा दावा केला. संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना नाना पाटोले यांनी मात्र त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, अशा शब्दांत संजय राऊत यांची हवा काढली.
शिवसेनेने काँग्रेसच्या हक्काची सांगलीची लोकसभेच्या जागा आपल्याकडे खेचून घेतली. संजय राऊत यांनी तिथे तीन दिवस तळ ठोकला होता. त्यानंतर ते इतरत्र प्रचाराला गेले पण पुन्हा एकदा ते सांगलीत आल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधान पदाची पुडी सोडली. “इंडिया” आघाडीत पंतप्रधान पदासाठी अनेक दावेदार आहेत. आमच्याकडे “मोदी एके मोदी” असला प्रकार नाही, पण इंडिया आघाडीचा पंतप्रधान चर्चेत ठरेल. उद्धव ठाकरेंकडेही पंतप्रधानपदाची क्षमता आहे आणि त्यांचे नाव त्या पदासाठी समोर आले, तर शरद पवार पाठिंबा देतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.
मात्र त्या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचे हवा काढली. कालपर्यंत संजय राऊत राहुल गांधींना पंतप्रधान करायला निघाले होते, पण आज त्यांना अचानक उद्धव ठाकरे दिसायला लागले. राऊत रोज त्यांची वक्तव्ये बदलतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आम्ही त्यांची विधाने गांभीर्याने येत नाही, अशा परखड शब्दांत नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचे वाभाडे काढले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतली सगळी राजकीय विसंगती जनतेसमोर उघड्यावर आली.
Uddhav thackeray PM, nana patole targets Sanjay and sharad pawar
महत्वाच्या बातम्या
- विदर्भात 2019 पेक्षा 5% कमी मतदान; देशातील मतदानात 8% घट, गतवेळी झाले होते सरासरी 69% मतदान
- देशातल्या पहिल्या नंबरच्या उद्योगपतीच्या घरी अमित शाहांबरोबर 5 – 6 बैठका होऊनही पवारांनीच शब्द फिरवला; अजितदादांचाही
- इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा ‘हा’ मोठा निर्णय
- मणिपूरमध्ये मतदानाच्या दिवशी हिंसाचार, मतदान केंद्रावर EVM फोडले