विशेष प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपल्या गटासाठी तीन नावे आणि तीन निवडणूक चिन्हे सादर करून नेमका कुणाचा राजकीय ऑप्शन लॉक केला आहे??… ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा?? हा प्रश्न त्यांच्या आजच्या फेसबुक लाईव्हनंतर पडतो आहे. Uddhav Thackeray opened his cards by declaring 3 options of his political party’s names
उद्धव ठाकरे यांनी आज बऱ्याच दिवसांनी 9 ऑक्टोबर 2022 रोजी फेसबुक लाईव्ह करून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना संबोधित केले. त्यात त्यांनी आजच्या कोजागिरी पौर्णिमेचा उल्लेख करून लक्ष्मीची कथा सांगितली. पण आपल्यासाठी दिवस आणि रात्र वैऱ्याची असल्याचे त्यांनी आपल्या गटाच्या नेत्यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी आपल्या गटासाठी निवडणूक आयोगाला सादर केलेली ती निवडणूक चिन्हे त्रिशूल, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही फेसबुक लाईव्ह दरम्यान दाखवली. त्याच वेळी त्यांनी आपल्या गटासाठी तीन नावे निवडणूक आयोगाला कळविण्याचे सांगितले ती म्हणजे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे!! अर्थात ही तीन नावे सांगून उद्धव ठाकरे यांनी नेमक्या कोणाच्या गटाचा राजकीय ऑप्शन लॉक केला आहे?? हा प्रश्न पडतो.
कारण एकनाथ शिंदे गट आपल्या पक्षाचे नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे घेणार अशी राजकीय अटकळ फार पूर्वीपासून बांधली गेली होती. अर्थात ही अटकळ मराठी माध्यमांनी बांधली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे तेच ठाम मत असेल असे काहीही सांगता येत नव्हते. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला तीन नावे आणि तीन चिन्हे पाठवून आपले राजकीय पत्ते खोलले आहेत… एकनाथ शिंदे गटाने कोणत्याही स्थितीत आपल्या पक्षाच्या नावात बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरू नये यासाठी त्यांनी हे केले आहे. पण मग जर बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज वगैरे नाव धारण केले तर हा राजकीय पराभव नेमका कोणाचा असेल?? कारण मूळातच प्रबोधनकारांच्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतली शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची परमदैवत मानणारी शिवसेना हीच होती ना!! मग उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेचे नाव फक्त स्वतःच्या, बाळासाहेबांच्या आणि प्रबोधनकारांच्या नावाशी संलग्न ठेवून नेमके काय मिळवले?? हा प्रश्न पडतो…!!
भले उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ताबडतोबीने आपल्या गटासाठी तीन नावे आणि तीन चिन्हे कळविली असतीलही, पण त्यामुळे एक प्रकारे त्यांनी आपल्याच स्वतःचे राजकीय “ऑप्शन लॉक” करून घेतले. आपले राजकीय पत्ते खुले केले… पण त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला बाकी सर्व ऑप्शन खुले करून ठेवले… की जे थेट छत्रपती शिवाजी महाराज किंवा अन्य महान हिंदुत्व आयकॉन नेत्यांशी संबंधित आहेत. याचा विसर उद्धव ठाकरे यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याला पडलाय का?? हा या निमित्ताने प्रश्न विचारावासा वाटतो. याचे उत्तर भविष्याच्या उदरात दडले असेल!!
Uddhav Thackeray opened his cards by declaring 3 options of his political party’s names
महत्वाच्या बातम्या
- WATCH देशाच्या अर्थमंत्री जेव्हा भाजी खरेदी करतात : निर्मला सीतारामन चेन्नईच्या बाजारात पोहोचल्या, स्वत: निवडून केली भाजीपाला खरेदी
- ठाकरे विरुद्ध शिंदे : धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर एकाच नावावर दोन्ही गटांचा दावा!!
- गुजरातेत लागले ‘हिंदूविरोधी केजरीवाल’चे पोस्टर्स : दिल्लीचे मुख्यमंत्री गुजरात दौऱ्यावर
- PFI सदस्यांची तपास संस्थांना कबुली : मुस्लिम ब्रदरहूडसारखी संघटना बनायचे होते