“भूतकाळ विसरून वर्तमान गमावले आणि झाले मोकळे आकाश म्हणत भविष्याचे दिवास्वप्न पाहिले!!”, अशी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची आजची 8 जुलै 2022 ची अवस्था आहे!! उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेचा तिसरा नेता मुख्यमंत्रीपदी बसवून देखील संघटनात्मक पातळीवर शिवसेनेला आतापर्यंतची सर्वात मोठी हार पत्करावी लागलेली आहे. स्वतःच्याच पक्षाचा आणि ठाकरे घराण्यातल्या मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला राजकीय अस्तित्वाचा लढा पुन्हा शून्यापासून सुरुवात करून उभारावा लागत आहे. Uddhav Thackeray lost Shivsena due to Pawar – Raut duo, also lost Hindutva legacy of balasaheb Thackeray
मराठी माध्यमांमध्ये याच्या बातम्या, “आदित्य ठाकरे यांचा नवा हुंकार”, “शिवसेना लागली कामाला”, “संजय राऊत म्हणतात, झाले मोकळे आकाश, आता शिवसेना लवकरच महाराष्ट्राच्या ताब्यात घेणार” अशा आल्या असल्या तरी राजकीय वास्तव हेच आहे की शिवसेनेची महाराष्ट्रातील संघटना ठाकरे घराण्याच्या हातातून निसटली आहे आणि आदित्य ठाकरे यांना आपल्या आजोबांच्या पुण्याईवर आणि वडिलांच्या राजाचे कर्तृत्वावर शिवसेना नामक नव्या संघटनेची उभारणी करावी लागणार आहे.
– हिंदुत्वाचा वारसा गमावला
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आपल्या वडील आणि आजोबांचा हिंदुत्वाचा भूतकाळातला वारसा गमावला. त्यामुळे त्यांच्या नशिबी सध्याचे “वर्तमान” आले!! अवघ्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार तर व्हावे लागलेच, पण त्याचबरोबर संपूर्ण संघटना देखील गमवावी लागून शिवसेनेचे “वर्तमान” अंधकारमय पहावे लागेल आणि आता आदित्यच्या बळावर भविष्यातली स्वप्न पाहायला लागले आहे!! शिवसेनेच्या 56 वर्षांच्या राजकीय इतिहासातली ही जर फलश्रुती असेल तर केवळ बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला हिंदुत्वाचा जबरदस्त वारसा स्वतःहून दूर लोटणे हेच त्याला कारणीभूत ठरलेले दिसते आहे. मुख्यमंत्री पदाची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊन देखील एखाद्या नेत्याच्या जीवनात राजकीय अपूर्णांक किती ठळक मोठा होऊ शकतो याचे उद्धव ठाकरे हे उत्तम उदाहरण ठरले आहेत!! मराठी आणि हिंदुत्व हे शिवसेनेचे सर्वोच्च आणि सर्वोत्तम भांडवल होते. हे भांडवल स्वतःहून उद्धव ठाकरे यांनी संपवून टाकले. परिणामी संघटनेवरची पकड पूर्ण निसटली.
– पवार – राऊत जबाबदार तरीही…
यामध्ये त्यांचा शरद पवारांबरोबर झालेला राजकीय सहवास किती कसा?? संजय राऊत यांनी वारंवार जाहीर बोलून शिवसेनेचे नुकसान किती आणि कसे केले??, यावर कितीही चर्चा आणि खल केला तरी आणि त्यात तथ्य असले तरी एक वस्तुस्थिती मात्र बदलत नाही, ती म्हणजे जर घरातला मूळ पुरुष घट्ट असेल तर बाहेरच्यांनी कितीही प्रयत्न केले तरी काही फरक पडत नाही पण मूळ पुरुष घट्ट नसेल तर मात्र बाहेरच्याच गोष्टी ते घर ताब्यात घेतात तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे झाले आहे!!
पवारांच्या साथीने “कमाई”
शिवसेनेने 40 आमदार 14 खासदार मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नागपूर, संभाजीनगर या महापालिकांमध्ये शेकडो नगरसेवक गमावले आहेत. एका पाठोपाठ एक बालेकिल्ले स्वतःच्या डोळ्यासमोर ढासळत असल्याचे उद्धव ठाकरे यांना बघावे लागत आहे. पवारांच्या साथीने गेल्या अडीच वर्षातल्या मुख्यमंत्री पदाच्या सत्तेतली उद्धव ठाकरे यांची ही “कमाई” आहे!!
Uddhav Thackeray lost Shivsena due to Pawar – Raut duo, also lost Hindutva legacy of balasaheb Thackeray
महत्वाच्या बातम्या
- आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा : शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी, खिंडार बुजवण्यासाठी सिमेंटिंग फोर्स!!
- हेट पोस्ट : सोशल मीडियावरील धार्मिक तेढ वाढवणाऱ्या पोस्ट महाराष्ट्र पोलिसांच्या रडारवर!!
- औरंगाबाद नामांतराला विरोध : महाविकास आघाडीच्या शेवटाचे स्क्रिप्ट, काँग्रेस – राष्ट्रवादीचा एक्झिट प्लॅन!!
- चहावाला पंतप्रधान, रिक्षावाला मुख्यमंत्री!!; ठाण्यात रिक्षाचालकांनी लावलेत अभिमान फलक!!