• Download App
    Uddhav thackeray उद्धव ठाकरेंच्या जिभेला ना धरबंध, ना लगाम

    Uddhav thackeray : उद्धव ठाकरेंच्या जिभेला ना धरबंध, ना लगाम; ढेकूण, अहमद शाह अब्दाली म्हणून काढली भडास!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : उद्धव ठाकरे यांच्या जीभेला ना उरलाय धरबंध, ना लागलाय लगाम; ढेकूण आणि अहमद शाह अब्दाली म्हणून काढली भडास!! दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या भांडणाचा पुढचा अंक उद्धव ठाकरे यांनी पुण्यातून सुरू केला.

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येत असताना पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी जीभ सैल सोडली. त्यांनी देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.

    उद्धव ठाकरे म्हणाले :

    बऱ्याच वर्षानंतर मी पुण्यात तुमच्यासमोर येतोय. आज मला जाहीर सभा घ्यायची होती. आता लढाई मैदानात होणार. हॉलमध्ये होणार नाही. मी परवा शिवसैनिकांसमोर मी बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहीन माझ्यापायाशी कलिंगड ठेवलं. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण??, तर मी म्हणजे संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष!!

    मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला बोटानं चिरडलं जातं. ते म्हणाले, माझ्या नादाला लागू नका. अरे तुझ्या नादाला लागण्याएवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस!!

    तुम्ही मला औरंगजेबाचा फोन क्लब म्हणता ना, तेव्हा लाज नाही वाटतं. आम्ही भगवं वादळ आहोत. तुमचे अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे वंशज आहेत.

    पर्यावरण हा विषय पुणेकरांचा आहे. विकासाचं स्वप्न दाखवलं जातं. जॉगिंग ट्रॅक होईल अमूक होईल. ते ठीक आहे. पण त्यामुळे शहराची काय हानी होणार आहे ते सांगा. सध्या अनेक ठिकाणी पूर येत आहे. त्याला निसर्ग जबाबदार आहे. पण आपणही आहोत. मुंबईत मेट्रोच्या कामामुळे पाणी साचत आहे. मुंबईकरांना गटाराचं पाणी येत आहे. त्यामुळे पोटाचे विकार होत आहे. पुण्यात मुळा मुठा नदी आहे. त्याबाबत व्यंकय्या नायडू आले होते. त्यांनी मुळा मुठा हे काय नाव आहे. व्यंकय्या नाव ठेवायचं का की मोदी नदी म्हणायचं?? त्यांनी नद्यांची नावे बदलायला सांगितली. नावं तर बदलू शकत नाही. पण त्यांनी प्रवाह बदलला”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

    – पुण्यात नाईक बेट आहे. या नाईक बेटाचे दोन्ही बाजूने प्रवाह बंद केला. प्रवाह बंद करून घरे बांधली. मग नदी का घुसणार नाही इकडे तिकडे. मला पुण्याचा शाश्वत विकास करायचा आहे. मी पुण्याच्या कामाची दखल घेतली नव्हती. कारण पुण्यात काही सुभेदार बसले होते. आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यात स्टे दिला होता. यांनी तो स्टे काढला. त्यांनी नदीच्या जागेवर कामं सुरू केली. हा विकास म्हणायचा. हा विकास नाही. विखार आहे. म्हणूनच आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्यासाठी तू राहशील किंवा मी राहील. तू विकासाच्या नावाखाली वाट लावली. त्यामुळेच आम्ही बोलत आहोत.

    Uddhav thackeray loose talk on fadnavis and amit Shah

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस