• Download App
    किंचाळतो बाई झाकण झुला!!; विडंबन काव्यातून उद्धव ठाकरेंवर निशाणा!!Uddhav Thackeray is targeted by satirical poem by shefali vidya

    किंचाळतो बाई झाकण झुला!!; विडंबन काव्यातून उद्धव ठाकरेंवर निशाणा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : पक्ष गेला, चिन्ह गेले त्यामुळे उद्धव ठाकरेंची नेमकी कशी अवस्था झाली आहे?, यावर सोशल मीडियावर वेगवेगळी मीम्स तुफान व्हायरल होत आहेत. प्रसिद्ध ब्लॉगर शेफाली वैद्य यांची एक विडंबन कविता असेच व्हायरल झाले आहेत ती अशी : Uddhav Thackeray is targeted by satirical poem by shefali vidya

    किंचाळतो बाई झाकण झुला

    किंचाळतो बाई, झाकण झुला
    धनुष्य गेले, बाण गेला, व्हीपही गेला

    काकांची वेणू, काँग्रेसच्या टिपर्‍या
    मवीआचा गोफ, १०० कोटींची माया
    सर्व होते मस्त तरी का आवळला गळा

    प्राणहीन भासे, सत्तेचा थाट
    रंगहीन सारे, नसता एकनाथ
    चोहीकडे मज दिसे कमळ सापळा

    जिंकलास येथे, शिंदे नंदना तू
    रडे कोणी मातोश्रीत, हासतोस तू,
    रात सरे, शिवी उरे, माज गळला

    बडबडतो बाई, झाकण झुला
    धनुष्य गेले, बाण गेला, व्हीपही गेला

    – शेफाली वैद्य

    (सौजन्य : फेसबुक)

    Uddhav Thackeray is targeted by satirical poem by shefali vidya

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    स्वतः अध्यक्ष राहिलेल्या आणि नातवाला अध्यक्ष केलेल्या पवारांना आता क्रिकेटमध्ये राजकीय व्यक्ती नको!!

    Maharashtra Govt : संस्थांनी दिलेला निधी वापरा, नाही तर परत द्या; राज्य शासनाचा 28 फेब्रुवारपर्यंत अल्टिमेटम

    Bachchu Kadu : बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; चर्चा अयशस्वी ठरल्यास ‘रेल रोको’चा इशारा