• Download App
    उध्दव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फुल टाईम मुख्यमंत्री हवा, विधानसभा भंग करून निवडणुका घेण्याचे सीटी रवी यांचे आव्हान|Uddhav Thackeray is part-time CM, we should have full-time CM like Devendra Fadnavis, CT Ravi's challenge to dissolve assembly and hold elections

    उध्दव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फुल टाईम मुख्यमंत्री हवा, विधानसभा भंग करून निवडणुका घेण्याचे सीटी रवी यांचे आव्हान

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सध्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. राज्यातील जनतेला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फुल टाईम मुख्यमंत्री हवा आहे. त्यामुळे हिंमत असेल तर महाराष्ट्र विधानसभा भंग करून राज्यात निवडणुका घ्या, राज्यातील जनता निवडणुकीसाठी तयार आहे असे आव्हान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी दिले आहे.Uddhav Thackeray is part-time CM, we should have full-time CM like Devendra Fadnavis, CT Ravi’s challenge to dissolve assembly and hold elections

    भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतरवी े बोलेत होते. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.



    यामध्ये महाविकास अघाडी सरकारवर जोरदार हल्ले चढवण्यात आले. रवी म्हणाले, महाराष्ट्रात सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. ते कधी झोपतात, कधी उठतात आणि कधी काय करतात हे कुणाला सांगता येत नाही.

    राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक फुलटाईम मुख्यमंत्री हवा आहे. हिंमत असेल तर विधानसभा भंग करून नव्याने निवडणूक घ्या. राज्यातील जनता या निवडणुकीसाठी सज्ज आहे.2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून दिले.

    भाजपला सत्तेत बसवण्याचा कौल जनतेने दिला होता. तरीही त्यावेळी भाजपसोबत युती असणाऱ्या शिवसेनेने जनतेला दगा दिला. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करून सरकार स्थापित केले. महाविकास आघाडी सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही असेही सीटी रवी म्हणाले.

    Uddhav Thackeray is part-time CM, we should have full-time CM like Devendra Fadnavis, CT Ravi’s challenge to dissolve assembly and hold elections

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस