प्रतिनिधी
संभाजीनगर : शिवसेनेतील फुटी नंतर उद्धव ठाकरे उद्या प्रथमच मुंबई बाहेर पडणार असून संभाजीनगर दौऱ्यात ते ओल्या दुष्काळाची पाहणी करणार आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगर दौऱ्यात प्रत्यक्ष मराठवाड्यातल्या काही शेतांवर जाऊन तिथल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागणी करणार आहेत. Uddhav Thackeray is out of Mumbai for the first time tomorrow after Shiv Sena split
परंतु उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगर दौरा शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर देखील महत्त्वाचा आहे. शिवसेनेतील फुटी नंतर मराठवाड्यातली बहुतांश शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. आमदार अंबादास दानवे त्याला अपवाद आहेत.
शिवाय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुखांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यात नेमके काय निर्णय घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरे यांचा दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे. कारण मुंबई ठाण्यापाठोपाठ शिवसेना मराठवाड्यात अतिशय बळकट राहिली आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मराठवाड्यातील शिवसेना देखील खिळखिळी झाली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नव्या पक्षाची संघटनात्मक बांधणी करताना उद्धव ठाकरे यांना तरुण वेगळ्या रक्ताला वाव द्यावा लागणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये नव्याने संघटना बांधणी करावी लागणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतात आणि त्यांचे शक्तिप्रदर्शन मराठवाड्यात कसे राहते?, यालाही विशेष महत्त्व आहे.
Uddhav Thackeray is out of Mumbai for the first time tomorrow after Shiv Sena split
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारची भेट; आज धनत्रयोदशीला देशातील 75000 तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे
- प्रधानमंत्री आवास योजना : धनत्रयोदशीला आज मध्य प्रदेशात 4.50 लाख लाभार्थ्यांचा आज गृहप्रवेश
- नोकरीची संधी : महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात 10000 पदांची भरती; वाचा वेळापत्रक
- राज – शिंदे – फडणवीस : स्नेहदीप उजळले; राजकीय मनोमीलनाचे पडले पाऊल पुढे