• Download App
    बारसू रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आता ‘यू टर्न’ घेताय – चंद्रशेखर बावनकुळे Uddhav Thackeray is now taking a U turn on Barsu Refinery Project  Chandrasekhar Bawankule

    बारसू रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आता ‘यू टर्न’ घेताय – चंद्रशेखर बावनकुळे

    मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्राचा बावनकुळेंनी केला आहे उल्लेख

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  बारसू रिफायनरी प्रकल्पावरून सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून या प्रकल्पाला विरोध वाढत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात या प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांना वगळून ही चर्चा झाल्याने बारसू प्रकल्पावर उद्धव ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार?, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. Uddhav Thackeray is now taking a U turn on Barsu Refinery Project  Chandrasekhar Bawankule

    बारसू प्रकल्पाच्या मुद्य्यावर प्रसारमाध्यमांना बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ‘’उद्धव ठाकरेंनी स्वत: हा प्रकल्प बारसूलाच व्हावा, ही रिफायनरी बारसूलाच व्हावी. आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, याची परवानगी केंद्र सरकारने तातडीने द्यावी. सर्व कार्यवाही केंद्र सरकारने पूर्ण करावी. असं स्वयंस्पष्ट पत्र दिलेलं आहे. मात्र आता ते यू टर्न घेत आहेत.’’

    याचबरोबर ‘’जेव्हा ते सरकारनमध्ये होते तेव्हा त्यांच्या लोकानी हे समजून प्रकल्प केला की, तिथे काही विकास नाही आहे. मग तेव्हाच सुनावणी का नाही घेतली? तेव्हाच जर तुम्ही ४० दिवस लोकांना वेळ दिला असता किंवा जनतेचं मत ऐकलं असतं, तर तेव्हाच तुम्हाला काही बोलता आलं असतं. मात्र प्रकल्प तुम्ही समोर नेला, तुमच्या पत्रात स्पष्ट आहे आणि आता तुम्ही म्हणत आहात की हे बरोबर होणार नाही, याला विरोध आहे.’’ असं बावनकुळे म्हणाले.

    याशिवाय, ‘’मला वाटतं शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी. एकत्र बसून जनतेच्या मनात काय संभ्रम आहे, हे पाहिलं पाहिजे. शेवटी जनतेला त्यांचा अधिकार, त्यांचं संरक्षण महत्त्वाचं आहे आणि जनतेचे अधिकार राखून प्रकल्प करण्यास मला वाटतं काही मनाई नाही.’’ अशा शब्दांमध्ये बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली.

    Uddhav Thackeray is now taking a U turn on Barsu Refinery Project  Chandrasekhar Bawankule

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!