वृत्तसंस्था
चिपळूण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. दुसरीकडे नितेश राणे यांनी ‘कोंबडी चोर ‘ या शिवसेनेच्या पोस्टरला जोरदार प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांना ‘घर कोंबडा’ ,असे म्हंटले आहे.Uddhav Thackeray Is ‘Home Cock’; Nitesh Rane Strong response to ‘Cock Thief’ poster of Shivsena
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापले आहे. नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मुंबईतील दादर टीटी परिसरात बॅनरबाजी पाहायला मिळाली.
शिवेसेनेने नारायण राणे यांचा ‘कोंबडी चोर ‘असा उल्लेख करत डिवचणारा बॅनर लावला होता. परंतु पोलिसांनी हे बॅनर काढून टाकले आहेत. शिवसेनेचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, यानंतर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करत शिवसेनेला डिवचलं आहे.
यामध्ये नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घरकोंबडा असा उल्लेख करणारा फोटो ट्विटर शेअर केला आहे. तसंच यामध्ये त्यांनी हा बॅनर कोण काढणार असाही सवाल केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे हेदेखील आक्रमक झाल्याचे दिसून आले.
नारायण राणेंनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेवर हल्ला चढवला. शिवसेनेत पूर्वीचे शिवसैनिक राहिलेले नाहीत. यांची उडी कुठपर्यंत जाते ते पाहू. केंद्रात आमचीच सत्ता आहे, असं सूचक विधान राणे यांनी केले आहे.
Uddhav Thackeray Is ‘Home Cock’; Nitesh Rane Strong response to ‘Cock Thief’ poster of Shivsena
महत्त्वाच्या बातम्या
- नितेश राणे यांनी केली संपूर्ण रेल्वेच बुक, कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवात मोदी एक्सप्रेस
- लष्करात महिलांचे पाऊल पडते पुढे, पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर बढती
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना प्रौढांइतकाच धोका असेल, तज्ञांनी प्रतिबंधासाठी या सूचना दिल्या
- मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, उपमुख्यमंत्री केवळ पुण्याचेच असल्यासारखे वागतात, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप