• Download App
    Uddhav Thackeray: INDIA Alliance Meeting Needed Urgently उद्धव ठाकरे म्हणाले- इंडिया आघाडीची बैठक लवकर व्हायला हवी

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले- इंडिया आघाडीची बैठक लवकर व्हायला हवी; निवडणुका जवळ, बैठका आवश्यक

    Uddhav Thackeray

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Uddhav Thackeray विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीपासून सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्षाच्या सुनावणीचा निकालाबाबत दिलेल्या संकेतापर्यंत अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीनंतर अद्याप इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, युनेस्कोच्या निर्णयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत त्यांनी समाजाला आणि सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली.Uddhav Thackeray

    उद्धव ठाकरे  (म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची कोणतीही बैठक झालेली नाही. लवकरात लवकर ही बैठक झाली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. बिहारसह अन्य राज्यांमध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक व्हायलाच हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.Uddhav Thackeray



    किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत करून दिली जबाबदारीची जाणीव

    युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळ यादीत स्थान दिले आहे. यावरही उद्धव ठाकरेंनी आनंद व्यक्त करत सर्वांना एक सल्ला दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसास्थळांचा दर्जा दिलेला आहे. तो दर्जा टिकवणे आणि गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे हे सरकारसह आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची महती होती आणि कायम राहिल, असेही त्यांनी म्हटले.

    बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्री स्पष्टीकरण देतील

    बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, निधी अभावी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे काम रखडले असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता, निधी नाही, तर काही तांत्रिक बाबी आहेत. याच्यावर मुख्यमंत्री चांगले स्पष्टीकरण देऊ शकतील, असे ते म्हणाले.

    सर्वोच्च न्यायालय शेवटची आशा

    शिवसेना पक्षाच्या नाव, चिन्ह आणि निशाणीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात संपूर्ण प्रकरणाचा निकाल देणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यावरही उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ऑगस्टपर्यंत केसचा निकाल देणार असतील, तर ही समाधानकारक गोष्ट आहे. आमची शेवटची आशा सर्वोच्च न्यायालयच आहे. जिथे या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल.

    आम्ही निवडणूक आयोगाचा निकाल मानत नाही

    निवडणूक आयोगाला आमचे चिन्ह देण्याचा अधिकार आहे. मात्र, पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार नाही. एखाद्या पक्षाचे नाव उचलून कोणत्याही येड्यागबाळ्याला द्यायचे, हे निवडक आयोगाचे कार्यक्षेत्र नाही. त्यामुळे त्यांनी दिलेला आदेश आम्ही मानत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

    Uddhav Thackeray: INDIA Alliance Meeting Needed Urgently

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sanjay Shirsat : संजय शिरसाट पुन्हा टार्गेटवर, सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप

    Shiv Sena : शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाचा निकाल 3 महिन्यांत; सुप्रीम कोर्टात 20 ऑगस्टला पुन्हा सुनावणी

    Eknath Shinde : मंत्री-आमदारांच्या वर्तनामुळे एकनाथ शिंदे नाराज; स्पष्ट इशारा- जबाबरीने वागा अन्यथा कावाईचा बडगा उगारावा लागेल