विशेष प्रतिनिधी
नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचले. या दोन्ही भेटींचे कारण गुलदस्त्यात असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या.
मात्र ठाकरे + फडणवीस आणि ठाकरे + नार्वेकर भेटीचे रहस्य आदित्य ठाकरे यांच्या विरोधी पक्षनेते पदात असण्याची दाट शक्यता नागपूरच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त झाली.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे विधानसभेत 20 आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्र विधिमंडळ शिवसेना पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे, तर विधानसभेतल्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांना निवडले आहे. ते स्वतः विधान परिषदेत आहेत. विधान परिषदेमध्ये सध्या त्यांच्याच शिवसेनेचे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. पण आता काँग्रेसने संख्याबळाच्या आधारावर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेतेपद मागितले आहे.
या पार्श्वभूमीवर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार आहेत त्यामुळे विधानसभेतले विरोधी पक्ष नेते पण आदित्य ठाकरे यांना मिळावे यासाठी स्वतः उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याचे मानले जात आहे.
Uddhav Thackeray himself lobbying for Aditya’s position as Leader of Opposition
महत्वाच्या बातम्या
- Georgia : खळबळजनक! जॉर्जियामधील रेस्टॉरंटमध्ये 12 भारतीय मृत आढळले
- Abhishek Banerjee : तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जींनीही ईव्हीएमवर काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले…
- Chhagan Bhujbal Outburst: अजितदादा + प्रफुल्ल पटेल + तटकरेंनी केल्या गेमा; भुजबळ म्हणाले, मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का??
- Manipur : मणिपूरमध्ये बिहारच्या 2 मजुरांची गोळ्या झाडून हत्या; 1 दहशतवादी ठार, 6 जणांना अटक