• Download App
    ऑर्थर रोड तुरूंगात संजय राऊतांना भेटण्यास उद्धव ठाकरेंना परवानगी नाकारली?Uddhav Thackeray denied permission to meet Sanjay Raut in Arthur Road Jail

    ऑर्थर रोड तुरूंगात संजय राऊतांना भेटण्यास उद्धव ठाकरेंना परवानगी नाकारली?

    प्रतिनिधी

    मुंबई : गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने अटक केलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे संजय राऊतांचा मुक्काम १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत असून सध्या ते ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इच्छुक होते. मात्र, ऑर्थर रोड तुरूंग प्रशासनाने उद्धव ठाकरेंना परवानगी नाकारली. मात्र, त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी ही बातमी फेटाळल्याचे समोर आले आहे. Uddhav Thackeray denied permission to meet Sanjay Raut in Arthur Road Jail

    ऑर्थर रोड तुरूंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संजय राऊतांची भेट घेण्यास उद्धव ठाकरे इच्छुक होते. पण तुरूंग प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. संजय राऊतांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरेंना न्यायालयाची परवानगी घेण्याचे निर्देश ऑर्थर रोड तरूंग प्रशासनाने दिले आहेत. जेल अधिक्षकांच्या कार्यालयात संजय राऊतांना भेटायला द्यावे, असा निरोप उद्धव ठाकरे यांच्यामार्फत ऑर्थर रोड कार्यालयाला पाठवण्यात आला होता. मात्र यावर तुरूंग प्रशासनाने नकार देत अशी भेट घेता येणार नाही, त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन या, असा निरोप दिला. मात्र या बातमीचा आमदार सुनील राऊत यांनी इन्कार केला आहे.

    पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची देखील चौकशी सुरू केली होती. तसेच राऊत यांचा निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना देखील अटक केली होती. प्रवीण यांच्या मदतीने राऊत यांनी हा गैरव्यवहार केला. यानंतर मनी लॉंड्रिंगची रक्कम तपासण्याचे काम सुरू असल्याचे ईडीकडून सांगितले जात आहे. या व्यवहारात प्रवीण राऊत यांनी मिळालेली रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप देखील ईडीने केला आहे.

    Uddhav Thackeray denied permission to meet Sanjay Raut in Arthur Road Jail

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!