प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित मुलाखतीचा पहिला भाग सामनात प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना हिंमत असेल तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न वापरता तुमच्या वडिलांच्या नावावर मते मागून दाखवा, असे आव्हान दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे वडील आहेत. शिवसेनेचे संस्थापक आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या नावावर मते मागतो पण तुम्ही शिवसेना फोडून भाजपा बरोबर पाट लावायला गेलात तर तुमच्या स्वतःच्या वडिलांच्या नावावर मते मागा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. Uddhav Thackeray dares rebellion MLAs not use name of balasaheb Thackeray in their campaign
पालापाचोळा उडून गेला आहे. आता सगळे स्वच्छ दिसत आहे. खऱ्या शिवसैनिकांची शिवसेना माझ्यासोबत आहे, असेही उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणाले आहेत.
– संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर
आपल्या वडिलांच्या नावावर मते मागाया आव्हानाला बंडखोर आमदार संजय शिरसाठ आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या यांचे वडील असतील. पण आम्हालाही ते पित्यासमानच होते. 38 वर्षे मी शिवसेनेत काढली. शिवसेनाप्रमुखांच्या नावावर मते मागून महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात शिवसेना आम्ही रुजवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे काही उद्धव ठाकरे यांची प्रॉपर्टी असू शकत नाहीत. ते सगळ्या महाराष्ट्राचे आहेत, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला. आम्हाला आज पालापाचोळा म्हणता. शिवसेनेतले एक दोन आमदार नव्हे, 40 आमदार फुटून बाहेर पडले आहेत. ते काय सगळे पालापाचोळा आहेत काय? त्यांनी आपापल्या भागात कष्ट करून शिवसेना रुजवली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांना देखील पित्यासमानच होते, असे प्रत्युत्तरही संजय शिरसाट यांनी दिली आहे.
– सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर
तर 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही मोदींच्या नावावर मते मागितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो शिवसेना आणि भाजपच्या प्रचारात लावले होते. मग तेव्हा नरेंद्र मोदी हे तुमचे वडील होते का??, असा बोचरा असावा सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. एकूण शिवसेना फुटीची ही लढाई आता कोण कोणाचे वडील? आणि कोणी कोणाचे फोटो लावून मते मागायची? या मुद्द्यावर येऊन ठेपलेली दिसत आहे.
Uddhav Thackeray dares rebellion MLAs not use name of balasaheb Thackeray in their campaign
महत्वाच्या बातम्या
- 9 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑगस्टला प्रसिद्ध होणार
- १०० कोटींमध्ये राज्यसभेची जागा, राज्यपाल करण्याचे आमिष, CBIने केला टोळीचा पर्दाफाश
- द फोकस एक्सप्लेनर : डॉलरच्या तुलनेत का कमजोर झाला रुपया? कशी सांभाळणार स्थिती? वाचा सविस्तर…
- Droupadi Murmu Profile : कोण आहेत द्रौपदी मुर्मू? पतीच्या निधनानंतर 2 मुलेही गमावली, शिक्षिका झाल्या; नंतर पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून काम