• Download App
    उद्धव ठाकरेंची शिवसेनेतली घटनादुरुस्ती बेकायदा; शिंदे गटाचा निवडणूक आयोगात युक्तिवाद Uddhav Thackeray changed Shivsena constitution illegally, argued shinde faction in election commission

    उद्धव ठाकरेंची शिवसेनेतली घटनादुरुस्ती बेकायदा; शिंदे गटाचा निवडणूक आयोगात युक्तिवाद

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची या मुद्द्यावर निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीच्या वेळी शिवसेनेच्या घटनेच्या मुद्द्यावर दोन्ही गटांमध्ये जोरदार घामासान झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या घटनेत बदल करून स्वतःला पक्षप्रमुख नेमून घेतले. हा घटना बदल बेकायदा असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाने केला आहे. त्याचबरोबर 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांनी गुप्तपणे शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या संघटनात्मक निवडणुका टाळल्या, याकडे देखील शिंदे गटाने लक्ष वेधले आहे. Uddhav Thackeray changed Shivsena constitution illegally, argued shinde faction in election commission

    महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी १४ फेब्रुवारीपर्यंत स्थगित केल्यानंतर सर्वांचे लक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाकडील सुनावणीकडे लागले. तिथे धनुष्यबाण चिन्ह कुणाचे यावर युक्तिवाद सुरू झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या गटाचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. मंगळवार, १० जानेवारी रोजी आयोगासमोर शिंदे गटाचा युक्तिवाद संपला. युक्तिवादाच्या वेळी महेश जेठमलानी यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. उद्धव ठाकरे यांनी २०१८ साली शिवसेना पक्षाच्या घटनेत बेकायदा बदल केले, असे म्हटले.

    संघटनेवर वर्चस्वाचा शिंदे गटाचा दावा

    शिंदे गटाने विधानसभेत बहुमत प्रस्ताव जिंकला आहे, हेच सत्य आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहे, हे सिद्ध होत आहे. आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे आणि संघटनात्मकदृष्टया पक्षावर आमचे संपूर्ण नियंत्रण आहे, असे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१८ मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत केलेला बदल एक फ्रॉड आहे, असेही नमूद केले आहे. कारण १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचा कायदा बनवला आणि त्यात पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात येईल, असे स्पष्ट म्हटले होते. मात्र, २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कायद्यात सुधारणा करून अशी निवडणूक घेण्यात येणार नाही, असे सुधारणा केली. शिवसेना पक्षप्रमुख पद वगळता कार्यकारिणीतील अन्य पदांसाठी निवडणूक घ्यायचीच नाही, असा तो बदल होता. पक्षप्रमुख कार्यकारिणीची निवड करेल हे चुकीचे आहे. त्यामुळे पक्षांतर्गत निवडणुका झाल्याच नाहीत, हे एक कारण आहे. यामुळे एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक खूप नाराज होते, म्हणून आम्ही जुलै २०२२ मध्ये प्रस्ताव पारित करत या कारणामुळे आम्ही वेगळे होत आहोत, असा निर्णय घेतला, असे निवडणूक आयोगाला सांगितल्याचे वकील महेश जेठमलानी म्हणाले.

    महेश जेठमलानींचे युक्तिवाद

    बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे सगळे अधिकार घेतले. शिवसेनेच्या घटनेत बदल करणे हे बेकायदेशीर आहे.

    शिवसेनेची घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब केंद्रित होती. पण नंतर ती उद्धव ठाकरे यांनी बदलून शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. मात्र त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत.

    जुलै 2022 मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून निवड करण्यात आली.

    कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

    या मुद्द्यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सध्या सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने लगेच निकाल देऊ नये, अशी मागणी करणारा युक्तिवाद केला.

    Uddhav Thackeray changed Shivsena constitution illegally, argued shinde faction in election commission

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!