प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर सावरकर हा मुद्दा देशाच्या सेंटर स्टेजवर आला आहे. महाराष्ट्रात शिवसेना – भाजपने सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. त्याच वेळी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेमध्ये देखील सावरकरांचाच विषय गाजला आहे. नुसतं नाव घेऊ नका. हिंमत असेल, तर सावरकरांना भारतरत्न द्या आणि पाकव्याप्त काश्मीर जिंकून दाखवून सावरकरांचे स्वप्न पूर्ण करा, असे आव्हान माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातल्या मोदी सरकारला आज दिले. Uddhav Thackeray challenges modi government to win pak occupied Kashmir and fulfill dream of Veer savarkar
वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी वीर सावरकर गौरव यात्रेचा उल्लेख केला गेला. सावरकर गौरव जरुर काढा. हिंदू जनआक्रोश नवीन सुरू झालाय. मुंबईत मोर्चा निघाला होता. कुठून काढला माहिती नाही. पण शिवसेना भवनपर्यंत आला होता. याचा अर्थ एकच जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर हिंदूंना आक्रोश करावा लागतोय मग नेत्याची काय शक्ती आहे?? महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोणत्याही समूदायाला आक्रोश करण्याची वेळ आली नव्हती, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
माझ्यावरती आरोप करत आहेत. मी हिंदुत्व सोडलं. या छत्रपती संभाजीनगरच्या मैदानात विचारतो की मी खरंच हिंदुत्व सोडलं तर एक उत्तर द्या. मी घरात जावून बसेन पुन्हा तोंड दाखवू नका. जातीय रंग देत असाल तर हा घटनेचा अवमान आहे. मी म्हणजे आम्ही महाविकास आघाडी. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडतो. मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तेव्हा मेहबूबा मुफ्ती बरोबर काश्मीरमध्ये सरकार बनवलं तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही का?, असेही ठाकरे म्हणाले. त्याचवेळी त्यांनी मोदी सरकारमध्ये हिंमत असेल, तर पाकव्याप्त काश्मीर जिंकून दाखवून सावरकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आव्हान दिले.
तुमची मस्ती असेल तर ती गाडण्यासाठी वज्रमूठ उभारली आहे. लाखो युवक सुशिक्षित आहेत. अनेकांची परिस्थिती बेताची आहे. कर्ज काढून पदवी मिळवेलेली आहे. अलिकडे डॉक्टरेटही विकत घेता येते. काहीजणं पाणीचं इंजेक्शन घेऊन फिरतो. अनेकजण पदव्या दाखवतात पण किंमत मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांना पदवी दाखवा म्हणून मागितलं तर २५ हजारांचा दंड बसतो. आज या व्यासपीठावर जयंत पाटील आणि मी आहे. आम्ही दोघं एकाच शााळेचे आहोत. बालमोहन विद्यामंदिरचे आहोत. त्या शाळेला मंत्री झाल्यानंतर अभिमान वाटला होता. असा अभिमान पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्यांना का वाटू नये? पदवी मागितली तर दाखवणार नाही. मग या पदवीचा उपयोग दंड भरण्यासाठी घेता का काय?, असेही ते म्हणाले.
मला एक सांगा, महाविकास आघाडी सरकार पसंत होतं की नव्हतं? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीत वार करायचा? हो आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो होतो. पण सत्ता गेल्यानंतरही साथ आहोत. असं काही नाही की, मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. पण मला आवरावी लागते. मला अमित शाह यांना विचारायचं आहे, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी चाटतो. मग तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटताय? चांगली चाललेली सरकार फोडायचं आणि पाडायचं. नितीश कुमार आणि लालू यादव यांचं सरकार पाडून तुम्ही काय चाटत होता??, असा सवाल ठाकरे यांनी केला.
Uddhav Thackeray challenges modi government to win pak occupied Kashmir and fulfill dream of Veer savarkar
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!
- धक्कादायक : ‘एलिझा’ चॅटबॉटसोबत सहा आठवडे बोलल्यानंतर बेल्जियममधील व्यक्तीची अखेर आत्महत्या!
- राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल
- नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा