प्रतिनिधी
रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बऱ्याच महिन्यानंतर मातोश्री बाहेर पडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजकीय पावलावर आपले राजकीय पाऊल ठेवले. ममता बॅनर्जी जशा विधानसभा निवडणुकीत भाजपवर तोंडसुख घेऊन काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी वगैरे पक्षांचे नेते फोडायच्या, तसेच उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये केले आहे. Uddhav Thackeray breaks NCP in ratnagiri district and targets eknath shinde, BJP and Election commission
उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार कदम यांना आपल्या गटात प्रवेश देऊन रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे 40 आमदार भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार तोंडसुख घेतले आहे.
शिवसेना हा पक्ष माझ्या वडिलांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला आहे. तो निवडणूक आयोगाने स्थापन केला नाही. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह चोर गटाला दिले आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला. त्याचवेळी जनतेने जर आपल्याला सांगितले तर आपण एका मिनिटात घरी जाऊ. वर्षा बंगला सोडला तेव्हा देखील मी सत्तेला शिकून राहिलो नव्हतो. तसेच जर जनतेने सांगितले तर मी पुन्हा घरी जाईन पण हा फैसला मी निवडणूक आयोग भाजप अथवा चोर गटावर सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला.
चोर गट म्हणजे रक्त पिणारा ढेकूण आहे त्याला चिरडायला फक्त एका बोटाची गरज आहे. आपल्याकडे तर संजय कदम यांच्या रूपाने आता मुलुख मैदान तोफ दाखल झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी संपूर्ण कोकणात पुन्हा एकदा आपला छत्रपती शिवरायांचा भगवा फडकेल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
राष्ट्रवादीतून ठाकरे गटात दाखल झालेले संजय कदम हे खेड मतदार संघात रामदास कदम यांच्या पुत्राविरुद्ध मशाल चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत त्यामुळे दोन शिवसेना मधल्या या टकरीत मधल्या मध्ये कोकणातली राष्ट्रवादी फुटली आहे.
उद्धव ठाकरे यांची ही सभा यशस्वी करण्यासाठी मुस्लिम सेवा संघाने प्रचंड मेहनत घेतली या सभेला मुस्लिमांनी हजर राहण्यासाठी त्यांनी पत्रक काढून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता, तसेच सभेला 25 ते 30 हजार मुसलमान उपस्थित राहतील, अशी ग्वाही देखील दिली होती.
Uddhav Thackeray breaks NCP in ratnagiri district and targets eknath shinde, BJP and Election commission
महत्वाच्या बातम्या
- धंगेकरांचा विजय वैयक्तिक, काँग्रेसचा नव्हे!!; नाना काटेंमुळे चिंचवडात कलाटे पडले; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस – राष्ट्रवादीला डिवचले
- ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी हिंडेनबर्ग अहवाल फेटाळला : म्हणाले- अदानी समूहावरील अहवाल केवळ आरोप; दोषी सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष
- भारतात होणार छोट्या विमानांची निर्मिती : एम्ब्रेयर आणि सुखोईच्या उत्पादनासाठी चर्चा, दुर्गम भागात होणार फायदा