विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोकणातला दौरा आटपून उद्धव ठाकरे वंदे एक्सप्रेस भारत मध्ये बसले. त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्यामुळे भाजपने त्यांना मोदी सरकारच्या विकासाचे “लाभार्थी” म्हटले. लवकरच त्यांना बुलेट ट्रेनचा प्रवास घडवू असे “आश्वासन”ही दिले!!Uddhav Thackeray boarded the Vande Bharat Express; BJP called him “beneficiary” of Modi government’s development!!
त्याचे झाले असे :
उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध तुफानी प्रचार करताना घरातून बाहेर पडून कोकणाचा तीन दिवसांचा दौरा केला. नारायण राणे यांच्या कणकवलीत सभा घेऊन त्यांनी कोकण दौऱ्याची सांगता केली. खेड मधून ते वंदे भारत एक्सप्रेस मध्ये बसले आणि मुंबईला पोहोचले. उद्धव ठाकरे यांच्या समावेत त्यावेळी रश्मी ठाकरे, खासदार विनायक राऊत, त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील होते.
उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारत प्रवासामुळे त्यांची खिल्ली उडवण्याची संधी भाजपला मिळाली. उद्धव ठाकरेंचे व्हायरल झालेले फोटोच भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरून आणखी व्हायरल केले आणि त्यांना मोदी सरकारच्या विकासाचे “लाभार्थी” म्हटले इतकेच नाही तर उद्धव ठाकरेंना या पुढचा प्रवास बुलेट ट्रेन मधून घडवू, असा टोमणाही भाजपने हाणला. भाजपने उद्धव ठाकरे यांचा वंदे भारतमधील प्रवासाचा फोटो ट्विट करत तिसरी बार….. मोदी सरकार!, असे दोन शब्दांचे कॅप्शन दिले आहे.
कोकणातून मुंबई वंदे भारतने प्रवास
उद्धव ठाकरे चार आणि पाच फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर होते. कोकणातून घेतलेल्या सभांमधून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. सरकारने विकास केला नाही, अशी त्यांनी आपल्या भाषणांमधून टीका केली. पण त्यानंतर उद्धव ठाकरे संध्याकाळी खेड स्थानकावरुन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसले आणि खेड ते मुंबई प्रवास वंदे भारत एक्स्प्रेसमधून केला.
मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी
वंदे भारत एक्सप्रेस ही नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. बुलेट ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनसाठी मोदी सरकारने मोठे काम केले आहे. त्यामुळे भाजपने उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारत प्रवासाचे दोन फोटो ट्विट केले. पहिल्या फोटोत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत विनायक राऊत दिसत आहेत. मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसरी बार….. मोदी सरकार!!, असे म्हणून भाजपने उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.
Uddhav Thackeray boarded the Vande Bharat Express; BJP called him “beneficiary” of Modi government’s development!!
महत्वाच्या बातम्या
- अबकी बार 400 पार वगैरे ठीक, पण मोदींनी भाजपसाठी लोकसभेत सांगितलेल्या 370 आकड्याचा नेमका अर्थ काय??
- मोदींनी लोकसभेत नेहरूंचे नाव घेतले; राहुल गांधींच्या निकटवर्ती खासदाराने सावरकरांना वादात ओढले!!
- लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी निवडणूक आयोगाचा मोठा आदेश
- अबकी बार NDA 400 पार, भाजपा 370; पंतप्रधान मोदींनी लोकसभेतल्या भाषणात सेट केले “टार्गेट”!!