प्रतिनिधी
मुंबई : गुजराती आणि राजस्थानी या मुद्द्यावर राज्यपालांनी भगतसिंग कोशियारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठलेली असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीकास्त्र सोडले आहे. भगतसिंग कोशियारी यांचे मन त्यांच्या डोक्यावरच्या टोपी सारखेच म्हणजे टोपीच्याच रंगाचे आहे, अशा शब्दात शरद पवारांनी त्यांच्यावर शरसंधान साधले आहे. Uddhav Thackeray and sharad Pawar used derogatory language while targeting governer Bhagat Singh koshiyari
भगतसिंग कोशियारी यांची टोपी उत्तराखंडच्या कुमाऊ मधली आहे. तिचा रंग काळा आहे. या काळ्या रंगावरूनच कोशियारी यांचे मन काळे असल्याचा टीका पवारांनी केली आहे, तर उद्धव ठाकरे यांनी भगतसिंग कोशियारी यांना कोल्हापुरी जोडा दाखवला पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या वक्तव्यात गुजराती आणि राजस्थानी समाजाची स्तुती होती. या दोन्ही समाजाच्या लोकांनी मुंबईच्या विकासामध्ये केलेल्या योगदानाचा उल्लेख होता. हे करताना त्यांनी मुंबईच्या आर्थिक राजधानी या बिरुदा विषयी भाष्य केल्याने ते वादग्रस्त ठरले. मात्र राज्यपालांच्या भाषेत अजिबात असभ्यता नव्हती. परंतु त्यांचे विधान वादग्रस्त ठरवून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मात्र सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून त्यांच्यावर शहर संधान साधले आहे काळ्या टोपी सारखे काळे मन हा शरद पवारांच्या टीकेचा आशय आहे. तर उद्धव ठाकरे यांनी थेट त्यांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची भाषा केली आहे.
पवार आणि ठाकरे यांच्या टीकेमध्ये वैयक्तिक आकसाचा रंग आहे. राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी ठाकरे पवार सरकारच्या काळातल्या अनेक निर्णयांना बदलायला लावले होते. इतकेच नाहीतर त्या सरकारने विधान परिषदेसाठी सुचविलेल्या 12 आमदारांची यादी मंजूर केली नव्हती याचा राग ठाकरे आणि पवारांच्या मनात अजून आहे. त्यातूनच सभ्यतेची मर्यादा ओलांडत या दोन्ही नेत्यांनी राज्यपालांवर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निमित्ताने शरसंधान साधले आहे.
Uddhav Thackeray and sharad Pawar used derogatory language while targeting governer Bhagat Singh koshiyari
महत्वाच्या बातम्या
- India TV survey : मोदी लाटेत काँग्रेस पुन्हा होणार भुईसपाट!!; प्रादेशिक पक्षांनाही मोठा फटका!!
- इंडिया टीव्ही सर्व्हे : लोकसभा निवडणुका झाल्या तर सरशी भाजप – शिंदे गटाचीच!!; राष्ट्रवादी सिंगल डिजिटमध्येच!
- हैदराबादचे भाग्यलक्ष्मी मंदिर चार मिनार पेक्षा पुरातन; ज्योतिरादित्य शिंदे यांचे भाग्यलक्ष्मीचे दर्शन!!
- ठाकरे घराण्यात उद्धव एकाकी; एकनाथ शिंदेंभोवती जमू लागला अन्य ठाकरे परिवार!!; स्मितानंतर निहार ठाकरे यांची भेट