विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या मोर्चात अदानी विरुद्ध हुंकार भरून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना जरूर साथ दिली, पण शरद पवार गटाने मोर्चाकडे पाठ फिरवली!! हे चित्र आज धारावीत दिसले. Uddhav thackeray and rahul gandhi come together against adani, but sharad pawar kept far distance from them!!
आत्तापर्यंत विरोधकांमधले फक्त राहुल गांधी थेट अदानींचे नाव घेऊन सातत्याने मोदी सरकारवर टीका करत होते, पण आता उद्धव ठाकरेंनी अदानींच्या मागे लागून राहुल गांधींना साथ दिल्याचे आज दिसले. पण शरद पवार गटाने मात्र या दोन्ही नेत्यांपासून अदानी मुद्द्यावर अंतर राखले.
अदानी उद्योग समूहाला धारावी पुनर्वसन प्रकल्प देण्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मोर्चा काढला. या मोर्चात काँग्रेसचे नेते सामील झाले पण शरद पवार गटाचा एकही नेता या मोर्चाकडे फिरकला नाही. उलट नेत्यांनी पवार गटाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांकडे कार्यकर्त्यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली. त्यामुळे महाविकास आघाडीत अदानी मुद्द्यावर फूट पडल्याचे मुंबईतल्या रस्त्यावर दिसले. मोर्चाच्या निमित्ताने धारावी ते बीकेसी परिसरात उद्धव ठाकरे पायी चालत बीकेसीपर्यंत आले. अदानी विरोधातील या मोर्चात काँग्रेसचीही एन्ट्री झाली, पण शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने या मोर्चाकडे पाठ फिरवली.
महाविकास आघाडी सरकार पाडायला अदानींनीच पैसा पुरवल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी हे नाव न घेता केला.
शिवसेनेने 7 मागण्यांसाठी हा मोर्चा काढला. आहे. धारावी टी जंक्शनपासून या मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा बीकेसी मैदानापर्यंत आला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, अरविंद सावंत, विनायक राऊत, सचिन अहिर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल देसाई, बाबूराव माने आणि काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड आदी नेते या मोर्चात सामील झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात धारावी टी जंक्शनपासून सर्वच नेते पायी चालत बीकेसी मैदानापर्यंत आले. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. मोर्चेकऱ्यांनी घोषणांनी हा परिसर दणाणून सोडला होता.
काँग्रेसची एन्ट्री
या मोर्चात सर्वाधिक लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे काँग्रेसची एन्ट्री. काँग्रेसचे नेते या मोर्चात सामील झाले. काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या मोर्चात अग्रभागी होत्या. वर्षा गायकवाडही अदानींच्या विरोधात घोषणा देत होत्या. मोर्चात काँग्रेसचे झेंडेही झळकत होते. कम्युनिस्ट पार्टीचे झेंडेही या मोर्चात दिसत होते. मात्र, शरद पवार गटाचा एकही नेता या मोर्चात आला नाही. त्यामुळे अदानी मुद्दयावर महाविकास आघाडीत बेबनाव असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
Uddhav thackeray and rahul gandhi come together against adani, but sharad pawar kept far distance from them!!
महत्वाच्या बातम्या
- छाप्यांमध्ये 351 कोटी सापडल्यानंतर 10 दिवसांनी धीरज साहूनी तोंड उघडले; “हात” वर करून मोकळे झाले, पण…
- अयोध्येत 22 जानेवारीच्या राम लल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर भाजपचे मतदारांसाठी अयोध्या यात्रांचे भव्य आयोजन!!
- विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ; शिवसेना आमदारांच्या पात्र पात्रतेचा निर्णय 10 जानेवारीला!!
- Good news! आता ‘या’ देशात जाण्यासाठी भारतीयांना गरजेचा नसेल ‘Visa’