विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले आहेत. आपले राजकीय मनोमिलन झाल्याचे त्यांनी कालच प्रबोधनकार ठाकरे यांच्या वेब पोर्टलच्या लोकांना प्रसंगी जाहीर केले आहे. यासाठी त्यांनी आपल्या दोन्ही आजोबांचा वारसा जनतेसमोर मांडला आहे. पण प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येण्याने महाराष्ट्रात मात्र दुरंगी तिरंगी नव्हे, तर एकदम पंचरंगी राजकीय लढाई रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Uddhav Thackeray and Prakash Ambedkar Alliance, five cornered contests likely in maharashtra municipal elections
महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होऊ शकतात. मुंबईसह 16 महापालिका निवडणुका शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाच्या किंबहुना राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. अशा स्थितीत राजकीय दृष्ट्या पूर्ण एकाकी पडलेल्या उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांचा हात धरला असल्यास त्यात नवल काही नाही. उद्धव ठाकरे यांची राजकीय वाट पूर्णपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गापासून दूर होऊन तिची चाल संभाजी ब्रिगेड आणि प्रकाश आंबेडकरांचे वंचित बहुजन आघाडी यांच्यासह पुढे जाणार आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्ही सोडले नाही, असे कितीही उद्धव ठाकरे म्हणाले तर याचा त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही.
कोणाविरुद्ध कोण?
त्या पलिकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला, तर महाराष्ट्रात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये खरंच पंचरंगी लढत ही होण्याची शक्यता आहे. जर ठाकरे आणि आंबेडकर एकत्र आले, तर राष्ट्रवादीला स्वतंत्रपणेच निवडणूक लढवावी लागेल. कारण राष्ट्रवादी बरोबर युती करणार नाही किंबहुना आपल्या युतीत राष्ट्रवादी नकोच, अशी जाहीर अट प्रकाश आंबेडकर यांनी घातली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची अट स्वीकारली, तर राष्ट्रवादी ही ठाकरे + आंबेडकर + संभाजी ब्रिगेड युतीच्या बाहेर असेल आणि प्रकाश आंबेडकरांची अट स्वीकारली नाही, तर राष्ट्रवादी + ठाकरे + संभाजी ब्रिगेड अशी युती असेल आणि प्रकाश आंबेडकर बाहेर असतील.
अशा स्थितीत महाराष्ट्रात बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युती, काँग्रेस स्वतंत्रपणे किंवा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, मनसे स्वतंत्रपणे, आणि ठाकरे + आंबेडकर आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर स्वतंत्रपणे अशा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या अर्थाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी पंचरंगी सामना सामने रंगणार आहेत.
पॉलिटिकल स्पेसची लिटमस टेस्ट
महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघात पंचरंगी सामन्यांसाठी तेवढी पॉलिटिकल स्पेस आहे का??, हा खरा प्रश्न आहे. पण याचीच चाचणी परीक्षा म्हणून महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये पंचरंगी लढती झाल्या तर त्यांचा निकाल बरेच काही सांगून जाईल आणि त्यानंतर कदाचित वेगळी समीकरणे आपोआपच उदयाला येतील.
Uddhav Thackeray and Prakash Ambedkar Alliance, five cornered contests likely in maharashtra municipal elections
महत्वाच्या बातम्या
- राहुलजींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातल्या अखेरच्या दिवशीही सावरकरांच्या मुद्द्यावर जयराम रमेश यांनी पुन्हा डिवचले
- महाराष्ट्र विधानसभा सुवर्ण महोत्सव उद्घाटन समारंभात पंतप्रधान राजीव गांधींसमोर लतादीदींचे सावरकरांच्या ज
- राहुल गांधींनी सावरकरांविषयी काय बोलावे हे उद्धव ठाकरेंनी सांगू नये; माणिकराव ठाकरेंनी भरला उलटा दम!!